मालेगावी निर्बंधांबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:15 AM2021-04-09T04:15:40+5:302021-04-09T04:15:40+5:30
मालेगाव : ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबवताना जमावबंदीसह संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी तथा घटना ...
मालेगाव : ‘ब्रेक द चेन’ मोहीम राबवताना जमावबंदीसह संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक धनंजय निकम यांनी दिल्या आहेत.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पारित करण्यात आलेल्या आदेशातील संभ्रम दूर करून निर्देशित केलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी निकम बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, महानगर पालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधीक्षक प्रदीप जाधव, लता दोंदे, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह शहर व ग्रामीणच्या सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी व महानगरपालिकेचे चारही प्रभाग अधिकारी उपस्थित होते. यावेळी ४५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही निकम यांनी केले.