सटाणा व नामपूर येथेआढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:45 PM2020-03-19T13:45:46+5:302020-03-19T13:46:19+5:30

सटाणा: कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पाशर््वभूमीवर आमदार बोरसे यांनी सटाणा व नामपूर येथे आज गुरु वारदि.१९वैद्यकीय अधीक्षक ,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे ,पालिकेच्या मुख्य अधिकारी हेमलता डगळे-हिले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली

Review meeting at Satana and Nampur | सटाणा व नामपूर येथेआढावा बैठक

 कोरोना च्या पाशर््वभूमीवर सटाणा येथे आरोग्य विभागाचा आढावा घेतांना आमदार दिलीप बोरसे समवेत तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील ,गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे ,तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे ,पालिकेच्या मुख्य अधिकारी हेमलता डगळे-हिले आदी. 

googlenewsNext
ठळक मुद्दे दक्षता:परदेशातून आलेल्या १४ नागरिकांवर देखरेख


.त्याप्रसंगी आमदार बोरसे बोलत होते .आपल्या गावात अथवा आपल्या घरी परदेशातून आलेल्या नातेवाईकांची माहिती तत्काळ ग्रामसेवक,पोलीस पाटील ंंअथवा तलाठ्याला कळविण्यात यावे .यामुळे त्यांची तत्काळ तपासणी करून वेळेवर उपचार करून त्याचा होणारा फैलाव रोखता येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले .यावेळी बहुतांश ग्रामीण रु ग्णालयात आण िप्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्याप्रमाणात वैद्यकीय अधिकारी ,वैद्यकीय अधिक्षक ,कर्मचार्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याचे आमदार बोरसे यांना निदर्शनास आले .या पाशर््वभूमीवर तहसीलदार ,गटविकास अधिकारी आण ितालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांची देखील मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या .

बागलाणमध्ये १४जण परदेशातून ...

तालुक्यात नेदरलँड ,दुबई ,लंडन आदी भागातून तब्बल १४ जण परदेशातून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली .या चौदा जणांना आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.आता पर्यंत कोरोना बाबत कोणतेही लक्षण दिसून आले नसल्याचे स्पष्ट केले .तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तालुक्यातील नामपूर ,सटाणा ,जायखेडा,लखमापूर ,तळवाडे दिगर ,साल्हेर ,मुल्हेर ,ताहाराबाद ,निताणे ,ठेंगोडा ,डांगसौंदाणे आदी गावातील आठवडे बाजारांवर बंदी आणली असुन तशा ग्रामपंचायत प्रशासनाला नोटीस देखील बजावल्याचे सांगितले .तसेच अंतापूर येथे दावल मलिक बाबा यात्रोत्सव ,मांगीतुंगी देवस्थान दर्शन देखील बंद करण्यात आले आहेत .मंदिरात लागणारे लग्न ,शहरातील दहा मंगलकार्यालयांना लग्न सोहळ्यांना ३१ तारखे पर्यंत बंदी आणण्यासाठी नोटीस बजावली आहे .तालुक्यातील ताहराबाद ,जायखेडा ,नामपूर ,डांगसौंदाणे ,लखमापूर ,ठेंगोडा ,मोरेनगर ,औंदाणे आदी ठिकाणच्या मंगलकार्यालयांना व बंड प;पथकांना देखील नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .सटाणा पालिकेला शहरासाठी स्वतंत्र रु ग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश यावेळी तहसीलदारांनी दिले .पालिकातर्फे तत्काळ भाडे तत्वावर रु ग्णवाहिका उपलब्द्ध करण्यात येईल असे मुख्य अधिकारी डगळे-हिले यांनी सांगितले .
 

Web Title: Review meeting at Satana and Nampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.