मालेगाव:- जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पाटील यांनी मालेगावी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांना कार्यालयांना भेट दिली.नाशिक ग्रामीण पोलीस प्रमुखपदी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शुक्रवारी मालेगावी भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष, शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे ,पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला मालेगाव बाबत जाणून घेतले यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.