सुरगाणा : शाळाबाह्य विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन तहसिलदार किशोर मराठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत केले.या बैठकीस विशेष शोध मोहीम समितीचे सहअध्यक्ष, गटविकास अधिकारी भावसार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. आर. भिंगारे, वरिष्ठ अधिव्याखाता योगेश सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे, तालुका बालरक्षक प्रतिनिधी शिक्षक रतन चौधरी, सदस्य सचिव गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, शासकीय कामगार अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 6:37 PM
सुरगाणा : शाळाबाह्य विशेष शोध मोहीम प्रभावीपणे राबवून स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हिच खरी सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन तहसिलदार किशोर मराठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत केले.
ठळक मुद्देसामाजिक जबाबदारी आहे