रिक्षाचालकाला जबर मारहाण; दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:27+5:302021-08-01T04:14:27+5:30
--- दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू नाशिक : दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ...
---
दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
नाशिक : दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शिलापूर गावात घडली. सागर चंद्रकांत मांडवे (४०, रा. माडसांगवी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मांडवे हे शिलापूर गावात दुसऱ्या मजल्यावर सेट्रिंगचे काम करत होते. तोल गेल्याने ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
---
मोटारीची काच फोडून लॅपटॉप गायब
नाशिक : कारची काच फोडून चोरट्याने कारमधील लॅपटाॅप लंपास केल्याची घटना राका कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी अंकित त्रिभुवनलाल काल्या (३०, रा. राका कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने २८ ते २९ जुलैदरम्यान अंकीत यांच्या ताब्यातील कारची काच फोडून २५ हजार रुपयांचा लॅपटॉप लंपास केला.
---
गुलाबवाडीमध्ये घरात शिरून कोयत्याने हल्ला
नाशिक रोड : मालधक्का रोड येथील गुलाबवाडी परिसरात दोघा संशयितांनी घरात घुसून विवाहितेच्या पतीवर कोयत्याने वार करत विवाहितेलाही मारहाण केल्याची घटना घडली आहे.
गुलाबवाडी येथील सोनू शब्बीर शेख यांनी फिर्यादीनुसार संशयित सिद्धार्थ धनेधर (फर्नांडिस वाडी, जयभवानी रोड) व आकाश श्रीवंत (गुलाबवाडी) हे दोघे शेख यांच्या घरात शिरले. आकाशने सोनू शेख याच्या डोक्यात कोयत्याने वार करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी सोनू यांच्या पत्नीने हस्तक्षेप केला असता तिलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
वनवैभव कॉलनीत महिलेची सोनसाखळी हिसकावली
इंदिरानगर : वडाळा पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या वनवैभव कॉलनीच्या रस्त्यावरून घरी जाणाऱ्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी ओरबडून नेल्याची घटना घडली आहे. सुनंदा रघुनाथ सानप (५६, रा. वनवैभव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.