रस्ते खड्डेयुक्तच..! दयनीय अवस्था : ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:17 AM2017-12-17T00:17:37+5:302017-12-17T00:19:02+5:30

राज्य खड्डेमुक्त करण्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेची मुदत शुक्रवारी (दि. १५) संपली.

Road pits ..! Poor state: 98 percent claim to be completed | रस्ते खड्डेयुक्तच..! दयनीय अवस्था : ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

रस्ते खड्डेयुक्तच..! दयनीय अवस्था : ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

Next
ठळक मुद्देघोषणेची मुदत शुक्रवारी संपलीउर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आठवडा लागेलबसस्थानकापासून रस्त्याच्या दुर्दशेला सुरुवात

नाशिक : राज्य खड्डेमुक्त करण्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेची मुदत शुक्रवारी (दि. १५) संपली. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध रस्त्यांचा आढावा घेतल्यास काही रस्ते खड्डेयुक्त असल्याचे आढळून आले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सदर काम आठ दिवस बंद राहिले, परिणामी मुदतीत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान, जिल्ह्यातील ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी आठवडा लागेल.
वाहनधारकांची हाडे खिळखिळी
शासनाची खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याची १५ डिसेंबरची घोषणा कशा प्रकारे फोल ठरली याचे उत्तम उदाहरण म्हणजे पेठ ते बाडगी हा रस्ता होय. शासनाने अशा प्रकारचे काही घोषित केले होते याची कोणतीही हालचाल या रस्त्याच्या सद्यस्थितीवरून दिसून येते. पेठ शहराच्या बसस्थानकापासून या रस्त्याच्या दुर्दशेला सुरुवात होते. संगमेश्वर मंदिरापर्यंत जाताना वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतात. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्यावर केवळ लाल माती वगळता अद्याप कोणत्याही प्रकारची खड्डे बुजविणे अथवा दुरुस्तीची कामे झाली नसल्याने शासनाच्या खड्डेमुक्ती ऐवजी हा रस्ता खड्डेयुक्त झाला आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील इतर रस्त्यांचीही झालेली पहावयास मिळत असून, खड्डे बुजविण्यासाठी नेमका किती खर्च झाला याची चौकशी करण्यासाठी संबंधित अधिकारी मात्र नॉट रिचेबल असल्याचे आढळून आले.
बागलाणला रस्त्यांची चाळण
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची दिलेली मुदत संपली आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यातील विविध रस्त्यांचा आढावा घेतल्यास बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्त्ये खड्डेमुक्त नव्हे तर खड्डेयुक्त असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षीदेखील अशीच मुदत जाहीर केली होती. रस्ते करायचे, पावसाळ्यात खड्डे पडणार आणि मंत्री खड्डेमुक्तची घोषणा करणार; मात्र या घोषणांच्या पावसात रस्ते खड्डेयुक्तच आहेत.
बांधकाम खाते बागलाण तालुक्यात दरवर्षी तीस ते चाळीस कोटी रुपये खर्च करते तरीदेखील रस्त्यांची अवस्था मात्र अतिशय वाईट आहे. या खराब रस्त्यांमुळे दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातो. सर्वाधिक अपघातांचे प्रमाण हे सटाणा शहरातून जाणाºया विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरचे आहे. खड्डे टाळण्याच्या नादात दिवसाआड अपघात होत आहेत. याला पोलिसांनीदेखील दुजोरा दिला आहे. हा रस्ता बीओटी तत्त्वावर बांधला आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण दीड वर्षापूर्वीच झाले होते; मात्र राजकीय दबावामुळे आजही या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांचा हकनाक बळी जात आहे. औरंगाबाद ङ्क्तअहवा राज्यमार्गावरील नामपूर जायखेडा-ताहाराबाद-मुल्हेर ङ्क्तबाभूळणे या मार्गाचीदेखील हीच अवस्था आहे. हा रस्ता की खड्डा अशी अवस्था निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीसाठी अनेकवेळा मोसम खोºयातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले; मात्र आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. हा रस्ता गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे अवजड वाहतुकीचे प्रमाणही मोठे आहे. खड्डेयुक्त रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारकांना कर भरूनही खड्डेयुक्त रस्त्यांवर वाहने चालवावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
सटाणा-डांगसौंदाणे रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी काम झाले.
या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे.हा मार्ग देखील खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे.डांगसौंदाणे ते साल्हेर ,मानूर रस्त्याची देखील चाळण झाली आहे.या रस्त्यांचे दरवर्षी कामे होतात बिले देखील काढली जातात .मात्र मार्ग खड्डे मुक्त होत नाही हा संशोधनाचा विषय आहे.सटाणा-नामपूर रस्त्या ठिकठिकाणी गुळगुळी आहे.मात्र काही ठिकाणी मात्र खड्ड्यांचे सम्राज्य आहे. एकंदरीत पावसामुळे रस्त्यावर पडणार्या खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे मुक्त महाराष्ट्राची सलग दुसर्या वर्षी घोषणा केली.मात्र मंत्री महोदयांच्या घोषणांच्या पावसात बागलाण तालुक्यात खड्डेच खड्डे अशी भीषण परीस्थिती सर्वदूर आहे.
कोट्यवधींची मलमपट्टी
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राज्य खड्डेमुक्त करण्याच्या घोषणेची मुदत शुक्रवारी (दि. १५) संपली. या कालावधीत सिन्नर तालुक्यातील सुमारे ३३७ किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामावर तीन कोटी रुपयांचा खर्च झाला. सुमारे ९८ कामे पूर्ण झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. सिन्नर तालुक्यात ९० किलोमीटर लांबीचे राज्य, २२२ किलोमीटर लांबीचे जिल्हा, तर २५ किलोमीटर लांबीचा सिन्नर-घोटी प्रमुख राज्यमार्ग आहे. या सुमारे ३३७ किलोमीटरच्या खड्डे बुजविण्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तालुक्यात खड्डे बुजविण्याचे काम बºयापैकी झाले असले तरी जिल्हा आणि राज्यमार्गावरील काही छोट्या-मोठ्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याचेही दिसून येते. राष्टवादी कॉँग्रेसकडून एकीकडे ‘सेल्फी विथ खड्डे’ आंदोलन केले जात असताना भाजपाच्या नेत्यांनी त्याला उत्तर देण्यासाठी खड्डेमुक्त अभियानावर भर देत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्नही झाल्याचे दिसून आले. राष्टÑवादीकडून रस्त्यावरील खड्ड्यांजवळ सत्यनारायण पूजन करून अनोखे आंदोलन केल्याने खड्ड्यांवरून राजकारण तापल्याचेही दिसून आले; मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘दादां’चा शब्द पाळण्यासाठी बºयापैकी काम केल्याचेही दिसून आले.
सिन्नर-घोटी या प्रमुख राज्यमार्गाची सिन्नर तालुक्यातील लांबी सुमारे २५ किलोमीटर आहे. त्यावरील सिन्नर हद्दीतील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याचे दिसून आले. सिन्नर-निफाड या राज्य मार्गासह सोमठाणे - पांगरी - मºहळ - दोडी -ठाणगाव, सिन्नर-डुबेरे-समशेरपूर, शिंदे-नायगाव, वडांगळी- कीर्तांगळी- खोपडी, सिन्नर-नायगाव, डुबेरे -सोनारी-पांढुर्ली, निमगाव (सिन्नर) -गुळवंच-देवपूर-पंचाळे-शहा या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बुजविण्यात आले आहेत. सिन्नर-नायगाव या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी मापारवाडी शिवारातील सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसी थे’ असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम खात्याने ‘दादां’चा आदेश बºयापैकी मनावर घेतला असला तरी तालुक्यात सुमारे १२०० किलोमीटर लांबीच्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या खड्डे बुजविण्याच्या कामासाठी ‘छदाम’ही मिळाला नसल्याने ग्रामीण भागातील खडखडाट कायम आहे.
दिंडोरीत मोठे खड्डे बुजविले, छोटे कायम !
दिंडोरी तालुक्यातील प्रमुख रस्ते असो की गावजोड शिवार रस्ते सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असताना बहुतांशी रस्त्यांचे नूतनीकरण आवश्यक असताना वारंवार मागणी करूनही साधे खड्डेही बुजविले जात नव्हते; मात्र राज्यभर रस्त्यांच्या खड्ड्यांबाबतचा प्रश्न ऐरणीवर येत राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे आश्वासन दिले. दिंडोरी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्यांवर खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरु वात झाली. अनेक रस्त्यांवरील बहुतांशी खड्डे बुजविल्याने खड्डेमुक्त झाले असले तरी अद्याप एक दोन रस्त्यांवरील खड्डे डांबर टंचाईमुळे भरणे बाकी असून, लवकरच सर्व रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे. दरम्यान एकीकडे बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे रस्ते खड्डेमुक्त होत असताना जिल्हा परिषदेअंतर्गत येणाºया रस्त्यांची दुरवस्था कायम असून, सदर रस्त्यांची डागडुजी
कधी होणार, असा सवाल नागरिक विचारत आहे. नाशिक-दिंडोरी-वणी-कळवण या प्रमुख मार्गावरील टोल नाका बंद झाल्यापासून देखभाल दुरु स्ती झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेला होता. सदर रस्त्याचे नूतनीकरण होणे आवश्यक होते, रस्त्याचे खड्डे बुजविले गेले आहे, मोठे खड्डे बुजविले असताना काही छोटे खड्डे तसेच राहिले आहेत. त्यातील काही ठिकाणी नूतनीकरण करण्यात आले आहे; मात्र सर्वच रस्त्याचे मजबुतीकरण, नूतनीकरण, रुंदीकरण करणे आवश्यक आहे. उमराळे, दिंडोरी, मोहाडी, जानोरी, वलखेड, ननाशी, लखमापूर फाटा, भनवंड, पिंपळगाव, वणी, सापुतारा या रस्त्यांमधील बहुतांशी खड्डे भरण्यात आले आहेत.
मालेगावी ३७० कि.मी. दुरुस्तीचा दावा
मालेगाव : राज्य खड्डेमुक्त अभियानात तालुक्यातील ३७० किलोमीटर अंतरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असल्याचा दावा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे; मात्र ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असल्यामुळे तालुका खड्डामुक्तीचा दावा फोल ठरला आहे. खड्ड्यांमधून वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. राज्याच्या ग्रामविकास खात्याची धुरा असलेल्या ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघात रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत पाच कोटी रुपयांचा खर्च रस्त्यावर झाला
असून, अजून तालुक्यातील रस्त्यांसाठी २०-२५ कोटी निधी खर्च करणार आहे. राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर राजकारण सुरू झाले होते. सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली जात होती. याची दखल सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. राज्य १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची धाडसी घोषणा केली. त्यानुसार यंत्रणा कामालाही

Web Title: Road pits ..! Poor state: 98 percent claim to be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.