महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:07 AM2018-07-26T00:07:41+5:302018-07-26T00:07:57+5:30

शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Road relics in Kalanagar, in the division of mayor Ranjana Bhansi | महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था

महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था

Next

पंचवटी : शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  दिंडोरी रोडवरील प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या कलानगर येथील लोकवस्ती दाट असून, याच कलानगर लेन क्र मांक ६ मध्ये असलेल्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनातर्फे खडीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गाळाचे साम्राज्य पसरलेले असल्याने आणि त्यातच नागरिकांना या रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने शहरापेक्षा खेड्यातील रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ परिसरात राहणाºया नागरिकांवर आली आहे.  पावसामुळे कलानगर लेन ६ मधील रस्त्यावरची खडी उखडली गेली असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्डे तयार झालेले आहेत.  याशिवाय या रस्त्यावर चिखल व गाळाचे साम्राज्य पसरले असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार व परिसरातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. महापालिका प्रशासन एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नाशिक शहराचा उल्लेख करत असली तरी दुसरीकडे मात्र खुद्द महापौरांच्या प्रभागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रशासनाने तत्काळ या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
आडगाव-म्हसरूळ रस्ता धोकादायक
आडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे  अपघात होतात; पण या समस्येकडे स्थानिक नगरसेवक व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वळणावरील रोडवर संरक्षक  कठडा बांधून नाला बुजविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ओंकार फार्मजवळील संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे कोसळून बाजूची माती वाहून गेल्याने रस्त्यालगत नाला तयार झाला आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांची अनेक वेळा तारांबळ उडते.

Web Title: Road relics in Kalanagar, in the division of mayor Ranjana Bhansi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.