वाहन अपघातांना आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत असते .
यावेळी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण, अपघातातील जखमींचा जीव वाचवणे, तातडीने उपचार करणे व त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देणे यासह अपघातग्रस्त व्यक्तींवर तातडीने उपचार करण्यासाठी १०८ क्रमांकाच्या वैद्यकीय सेवेचा वापर करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग लागली तर ती कशी आटोक्यात आणावी व काेणती खबरदारी घ्यावी, प्रथमोपचार व मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महामार्ग पोलीस घोटी टॅबचे कर्मचारी, महिंद्रा कंपनीचे अग्निशमन दलाचे अधिकारी हरीश चौबे, फायरमन मनोज भडांगे, हेमंत जोशी, राहुल पंडित, सचिन उघडे, उज्ज्वला करवा, पुष्पलता सुर्वे, हरदे, सोनवणे, पवार या शिक्षकवृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
250121\25nsk_3_25012021_13.jpg
===Caption===
इगतपुरी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी व अग्नीशमन अधिकारी.