रस्त्याच्या दुरवस्थामुळे खुला केला टोल नाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:24 PM2019-08-29T18:24:36+5:302019-08-29T18:25:25+5:30

पिंपळगाव बसवंत : कधी कर्मचाऱ्यांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर गुरूवारी (दि.२९) नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असल्याने पुन्हा आंदोलन छेडण्यात आले.

Road toll closed due to road mishap | रस्त्याच्या दुरवस्थामुळे खुला केला टोल नाका

रस्त्याच्या दुरवस्थामुळे खुला केला टोल नाका

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : दोन तासांच्या लेखी आश्वासने पुन्हा सुरू

पिंपळगाव बसवंत : कधी कर्मचाऱ्यांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर गुरूवारी (दि.२९) नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था जागोजागी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले असल्याने पुन्हा आंदोलन छेडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच सुरक्षेच्या दृष्टीने पिंपळगाव पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांनी अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व हे आंदोलन शांततेत पार पडले.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ओझर येथे एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला व लगेचच तेथील ओझरकरांनी एकत्र येत रस्ता रोको करत रस्ते प्राधिकरण यांच्या बद्दल निषेध नोंदविला यांची दखल घेत लगेचच प्रशासनाने रस्त्याच्या दुरिस्थसाठी कामाला सुरु वात केली.
त्याच अनुषंगाने पिंपळगाव चिंचखेड चौफुली ते टोल नाक्यापर्यंत रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे त्यामुळे पिंपळगाव येथील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यांची कामे होत नाही तोपर्यंत टोल नाक्याला टोल वसुली करायची नाही असा निर्धार करत पिंपळगाव टोल नाका खुला करून दिला.
पिंपळगाव टोल नाल्याच्या हद्दीतील महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती महामार्गाची झाल्याने ओझर प्रमाणे पिंपळगाव परिसरात देखील एखांद्या अपघात होऊन नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची कामे करणार असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी रस्ते प्रशासनाच्या अधिकार्यांना केला व जोपर्यंत पिंपळगाव परिसरातील महामार्गावर पडलेल्या खड्ड्याची कामे होत नाही तोपर्यंत पिंपळगाव बसवंत टोल नाका हा खुलाच राहील असे यावेळी नागरिकांनी सांगत टोल नाका खुला करून दिला व गुरु वारी रात्री बारावाजापासून येत्या आठ दिवसात रस्ते दुरु स्ती करून देतो अशा लेखी आश्वासनाने तब्बल दोन तासाने टोल नाका पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आला.
यावेळी सतीश मोरे, प्रशांत घोडके, मयूर गावडे, अल्पेश पारख, सोमनाथ बोराडे, दत्तू मोरे भाऊसाहेब खैरनार, गौरव पंडित. सतीश मोरे, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, प्रवीण मोरे, किरण संधान, दीपक शिंदे धनु विधाते, शुभम वाघ, बबलू सैय्यद, योगेश लावर, मोहीम शेख, जय रावल आदी नागरिक आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व सुरक्षेच्या दृष्टीने पिंपळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय महाजन, पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी, पोलीस कॉ. रवी बाराहते, पप्पू देवरे, पो. कॉ. बागूल, राहुल मोरे, रवी दराडे आदीसह पोलिस कर्मचार्यांचा अतिरिक्त बंदोबस्त यावेळी होता.
गेल्या सहा मिहन्यापासून पिंपळगाव बसवंत परिसरातील महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी तक्र ार करून देखील आतापर्यंत दुरु स्ती झाली नसल्याकारणाने सर्व पिंपळगाव करांच्या वतीने हा टोलनाका बंद करण्यात आला होता. येत्या आठ दिवसात जर या रस्त्यांची दुरु स्ती झाली नाही तर चिंचखेड चौफुलीवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम थांबवले जाईल व टोल नाका पुन्हा खुला करण्यात येईल व अधिक तीव्र आंदोलन पिंपळगाव नागरिकांकडून केले जाईल.
- सतीश मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस.

Web Title: Road toll closed due to road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.