टोमॅटो पिकाला करपा रोगाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:16 PM2020-08-01T17:16:51+5:302020-08-01T17:19:04+5:30

जळगाव नेऊर : टोमॅटो पिकावर जिवाणूजन्य करपा रोगाने आक्र मण केल्याने उत्पादनाच्या उंबरठ्यावर हजारो हेक्टरवरील टोमॅटो पिक संकटात सापडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

Roll out the tomato crop | टोमॅटो पिकाला करपा रोगाचा विळखा

जळगाव नेऊर परिसरात जिवाणूजन्य करपा रोगाने टोमॅटोला पडलेले काळे डाग.

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव नेऊर : शेतकरी झाले हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव नेऊर : टोमॅटो पिकावर जिवाणूजन्य करपा रोगाने आक्र मण केल्याने उत्पादनाच्या उंबरठ्यावर हजारो हेक्टरवरील टोमॅटो पिक संकटात सापडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली आहे. साधारणपणे आॅगस्ट महिन्याच्या मध्यापासून येथील टोमॅटोची राज्यात व राज्याबाहेर विक्र ी सुरू होते. परंतु, गेल्या पंधरा-वीस दिवसापासून कधी श्रावणसरी तर कधी जोराचा पाऊस तर कधी उष्ण-दमट वातावरण. यामुळे टोमॅटो पिकावर जिवाणूजन्य करपा रोग पडला आहे. टोमॅटो पीकाची पाने, फांद्या व फळांवर काळे ठिपके पडल्याने पिक फेकून देण्याची वेळ आली आहे.

जळगाव नेऊर येथील शेतकरी खंडु चव्हाणके यांच्या एक एकरावरील टोमॅटो पिकावर जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने करपली तर फळांवर काळे ठिपके असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाची अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.
 

Web Title: Roll out the tomato crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.