रोटरी क्लब नाशिकतर्फे ‘जागर स्त्रीशक्तीचा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:13 AM2018-10-24T00:13:52+5:302018-10-24T00:14:11+5:30
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.
नाशिक : रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये ‘इंटरव्ह्यू स्किल्स’ विषयावर निना रमानी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सचिव शशिकांत पारेख, सोनाली जोशी, अशोक साखला, ऊर्मिला देवधर, सुरेखा साखला, शीतल रांका, शिल्पा पारख उपस्थित होते. मुलींनी यशाचा मार्ग निवडताना आपल्या आवडीच्या क्षेत्राचा पूर्वाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. निवडलेल्या क्षेत्रात केवळ उत्तीर्ण नाही, तर सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. समाधानकारक यशापेक्षा, नावीन्यपूर्ण यश मिळविल्याचे समाधान वेगळे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलींनी ध्येय ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्हर्सटाइल अकादमीच्या संचालिका रमानी यांनी केले. प्रारंभी नवकार मंत्र व स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. परिचय शिल्पा पारख यांनी तर जैन बोर्डिंगचे सचिव शशिकांत पारख यांनीही मनोगत व्यक्त केले. सोनाली जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरीचे पदाधिकारी आणि मुली उपस्थित होत्या.