रोटरी क्लबचा रुग्णसेवा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:40 AM2020-12-11T04:40:43+5:302020-12-11T04:40:43+5:30
देवळाली कॅम्पला बिबट्याची दहशत दे.कॅम्प : देवळाली कॅम्प तसेच आजूबाजूच्या खेडेगावातील परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. दर दोन ...
देवळाली कॅम्पला बिबट्याची दहशत
दे.कॅम्प : देवळाली कॅम्प तसेच आजूबाजूच्या खेडेगावातील परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. दर दोन दिवसांनी कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन घडत आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. थंडीचे दिवस असल्याने नागरिक सकाळी सकाळी जाॅगिंगसाठी बाहेर पडतात. परंतु बिबट्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
निवृत्तीधारकांना मिळाला दिलासा
नाशिक : निवृत्तीधारकांना पेन्शनसाठी लागणारा हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत वाढवून मिळाल्याने निवृत्तीधारकांना दिलासा मिळाला आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. यापूर्वी ३१ डिसेंबर अशी तारीख देण्यात आली होती. परंतु मुदतवाढीचा निर्णय गेल्या मंगळवारी घेण्यात आला.
पाण्याचा अपव्यय
सिडको : सिडकोतील महाजननगर येथे पाईपलाईनमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. सिडकोत पाणीटंचाईची समस्या नेहमीच निर्माण होते. अनेकदा पाण्याचा अपव्ययदेखील होतो. पाईपलाईन फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. सिडकोत पाणीचोरी होत असल्याची देखील चर्चा आहे.
महामंडळाचे नुकसान
नाशिक: भारत बंदच्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महमंडळाच्या शहरातील बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आल्याने महामंडळाचे नुकसान झाले. बंदमुळे प्रवासी नसल्याने महामंडळातर्फे अनेक बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोनशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या.