नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे. देशात रस्ते अपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसरा आहे. तरुणाईचा फाजील आत्मविश्वास आणि बेधुंद प्रवृत्ती यामुळे वाढले आहेत. सुरक्षिततेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन न करता बेफिकरी दाखविणारे तरुण अपघातात बळी गेले आहेत. १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत आहेत.सुरक्षित वाहसुकीसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने अनेक उपाययोजना आखल्या जातात. सुरक्षिततेसाठी जनजागृतीदेखील केली जाते. प्रत्येक सिग्नलवर वाहनधारकांना सुरक्षिततेसाठी जागरूक राहण्याबाबतचे पोलीस प्रबोधन करीत असतात किंबहूना गेल्या वर्षी सुरक्षितसेसाठी पोलिसांनी व्यापक मोहीमही राबविली होती. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन वाहनधारकांना सुरक्षिततेचा ‘पाठ’ शिकविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. परंतु केवळ मोहिमेपुरते वाहनधारक सजगता दाखवितात. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असा पोलिसांचा अनुभव आहे. वाढती वाहनसंख्या, अरुंद रस्ते, वाहनधारकांकडून सुरक्षितता व वाहतूक नियमांची केली जाणारी पायमल्ली यामुळे शहरात दोन दिवसांआड एका जीवघेणा अपघात होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत शहरात १६३ जीवघेणे अपघात झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४ने वाढ झाली आहे़ प्रत्येक महिन्यात किमान पंधरा जीवघेणे अपघात होत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे़ अपघातात मृतांच्या संख्येपैकी सुमारे ५० टक्के मृत्यू हे २० ते ४० या वयोगटांतील तरुण असतात़ यातील महत्त्वाची बाब म्हणजे ८४ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़ महाराष्ट्रात सर्वाधिक अपघात हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, कल्याण-नगर-बीड, पुणे- नाशिक, पुणे-सोलापूर, नगर-औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्यांवर होत असून, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ तरुणांमध्ये आलेली बेफिकिरी अपघाताला आमंत्रण देणारी असते. रस्त्यावरून चालणारा चालक हा रस्त्यावर इतरांचा विचार न करता आपल्याच मस्तीत वाहन चालवित असल्याने त्याच्याबरोबर इतरांनाही अधिक धोका असतो. अलीकडे आलेल्या जादा सीसीच्या दुचाकी आणि डिस्क ब्रेकमुळे भरधाव वेगात दुचाकी चालविण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यातच रस्त्त्यावरून वाहन चालविताना आपल्याला कुणीही विचारते होऊ नये अशीच मानसिकता चालकाची असते याचमुळे तो प्रसंगी अटकाव करणाºया पोलिसांच्याही अंगावर धाऊन जात असल्याची उदाहरणे नाशिक शहरात घडली आहेत.सिग्नल तोडण्याची मानसिकताशहरात असलेले सिग्नल वाहतुकीची सुरक्षिता म्हणून बनविण्यात आलेले आहेत. परंतु सिग्नलवर थांबणे वाहनधारकाला कमीपणाचे वाटते. किंबहूना इतर लोक सिग्लवर थांबलेले असताना बेशिस्त चालक त्यांनाच मुर्ख समजून सिग्नल तोडून निघून जातात. सिग्नल हा तोडण्यासाठीच असतो अशी मानसिकता बळावू लागली आहे. ही मोठी गंभीर समस्या बनण्याची सुरुवात झालेली आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती अवजड दुचाकी देण्याचे पालकांचे चोचले त्यांनाच पश्चात्ताप करण्यास लावणारे ठरत आहेत. परंतु पालक यातून कोणताही धडा घेण्यास तयार नाहीत. लाखो रुपयांच्या वेगवान दुचाकी पालक आपल्या पाल्याच्या हाती सोपवत आहेत. पालकांनीदेखील आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी घरातूनच त्याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.कठोर कायद्याची गरजतरुणांच्या बेशिस्त वाहन हाकण्याला खरेतर कायद्याने जरब बसविण्याची आवश्यकता आहे. परदेशात ज्याप्रमाणे वाहतुकीचे कायदे आहेत तसे कायदे भारतात नसल्याने त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. इतकेच नव्हे तर बेशिस्त वाहनधारकाला शिस्त लावण्यासाठी वाहतूक व्यवस्थेसाठीच्या ज्या अद्ययावत यंत्रणा आहेत त्याचाही अभाव आहे. त्यामुळे रस्ते अपघातानंतर वाहनधारक पळून जाण्यास यशस्वी होत असल्याने गुन्ह्याचेही प्रमाण वाढले आहे. मोटार वाहन कायदे हे अदखलपात्र आणि किरकोळ तडजोडीचे असल्यामुळे वाहनचालकांना या कायद्याचा धाक वाटत नाही़ त्यामुळे गुन्हेगारी रोखण्याबरोबरच तरुणांची बेफिकिरी रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे.
नियमांची पायमल्ली : रस्ते अपघातात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; अतिआत्मविश्वास जीवघेणा मानवी चुकांमुळे घडतात सर्वाधिक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:14 AM
नाशिक : रस्ते अपघात हा महाराष्टÑासमोरील सर्वात गंभीर प्रश्न असून, त्यापेक्षाही अपघातात तरुणांचा होणारा मृत्यू चिंता करण्यास लावणारा आहे.
ठळक मुद्देअपघातात महाराष्टÑाचा क्रमांक दुसराजागरूक राहण्याबाबतचे प्रबोधन