'मेरी'चे कार्यालय फोडून ३८ हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:34 PM2019-12-10T16:34:19+5:302019-12-10T17:08:23+5:30

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, अस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

Ruptured Mary's office and extended her salary to Rs | 'मेरी'चे कार्यालय फोडून ३८ हजारांचा ऐवज लांबविला

'मेरी'चे कार्यालय फोडून ३८ हजारांचा ऐवज लांबविला

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होतेसर्रासपणे परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्रात (मेरी) अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि.७) निर्मिती कक्षाच्या अंतर्गत असलेल्या कार्यालय व भांडार कक्षाचे पत्रे उचकटून प्रवेश करत अ‍ॅल्युमिनियम, तांब्याचे सुमारे ११० किलो भंगारासह वेल्डींग यंत्र, उपकरणे असा एकूण ३८ हजार ८०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी मालमत्ता, अस्थापनांना अज्ञात भुरट्या चोरांच्या टोळीने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. चोरट्यांनी शनिवारीच अहल्यादेवी होळकर पूलाच्या लागून ‘वॉटर कर्टन’चे (इंद्रधनुष्य कारंजा) १५ एलईडी दिवे व ४० मीटरची केबल गायब केल्याची घटना घडली. एकूणच पंचवटी भागातील सरकारी अस्थापनांसह मालमत्ता असुरक्षित झाल्याचे बोलले जात आहे. सर्रासपणे परिसरात घरफोड्या, जबरी चोऱ्या घडत असल्याने पोलिसांची दिवस-रात्रीची गस्त थंडावल्याचे स्पष्ट होते.
मेरीच्या आवारातील कार्यालय व भांडारगृहातून चोरट्यांनी १सिंगल फेज वेल्डिंग यंत्र, बाष्पीभवन मापक उपकरणाचे २६ नग,१०५ किलो तांब्याचे भंगार, ९किलोचे अ‍ॅल्युमिनियम भंगार असा एकूण सुमारे ३८ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविल्याची फिर्याद वैभव प्रतापराव पाटील (४३,रा. गंगापूररोड) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार मिसाळ करीत आहेत.

Web Title: Ruptured Mary's office and extended her salary to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.