सिन्नर : शहरासह तालुक्यतील ग्रामीण भागात सोमवारी रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहराच्या विविध भागात रंग बरसेचा उत्साह होता. यावर्षी अनेकांनी कोरड्या रंगाची उधळण करत पाणीबचतीचा संदेश दिला.शहरातील प्रमुख चौकात अनेकांनी सार्वजनिकपणे रंगांची उधळण केली. शहरासह ग्रामीण भागातही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामूळे पाणीटंचाईचे सावट आहे. परिणामी शहरासह ग्रामीण भागात कोरड्या रंगांची उधळण करण्यात आली. मात्र, सार्वजनिक ठिकाणी झालेल्या रंगोत्सवात तरूणांनी अनेक ओल्या रंगांचा आनंद लुटला. प्रत्येकालाच वेगवेगळ्या रंगांचे आकर्षण असते. त्यामुळे रंगांचा सण असलेली रंगपंचमी मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरी करण्यात आली. तरूणांसह महिलांनीही एकमेकांना रंग लावून आंनद साजरा केला. शहरातील गल्लोगल्लीत बच्चेकंपनीसह कुटुंबीयांचाही उर्त्स्फूतपणे सहभाग दिसून आला. आपल्या मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी तरूणांचे जथ्थे शहरात दुचाकीवरून फिरत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. लोकसभेच्या निवडणूका असल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपआपल्या भागात रंगोत्सवात अनेकांना सहभागी करून घेतले.
सिन्नर शहरासह ग्रामीण भागात रंगपंचमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 5:40 PM