सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आधार ठरणार : अण्णासाहेब मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:46 AM2022-05-05T01:46:09+5:302022-05-05T01:46:30+5:30
सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार व आदर्शवत ठरेल. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर : सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे देशातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांना आधार व आदर्शवत ठरेल. भविष्यात लाखो रुग्ण येथून रोगमुक्त होऊन बाहेर पडतील, असा विश्वास गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वरनजीक रुग्णांना जगभरातील अत्याधुनिक सुविधा देणारे सद्गुरू मोरेदादा हॉस्पिटल आकार घेणार असून, या वास्तूचे भूमिपूजन बुधवारी (दि. ४) झाले. याप्रसंगी उपस्थित सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाऊली बोलत होते. या सोहळ्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, आयकर उपायुक्त विशाल माकवाना, माहिती प्रसारण ज्येष्ठ अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी नऊ वाजता पपू अण्णासाहेब, चंद्रकांत दादा व नितीन मोरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम विधिवत, मंत्रघोषात संपन्न झाला यानंतर समर्थ गुरुपीठाच्या प्रांगणात गुरुमाऊलींनी उपस्थित महिला पुरुष सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाच-सहा वर्षांपूर्वीच या रुग्णालयाचा संकल्प करण्यात आला होता; पण कोरोनासह इतर अनेक अडचणीमुळे प्रत्यक्ष काम लांबणीवर पडले; परंतु आता एक वर्षाच्या आत या हॉस्पिटलचा काही भाग उभा करून तो रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देऊ आणि टप्प्याटप्प्यात हे भव्यदिव्य रुग्णसेवेचे मंदिर जगभरातील गोर, गरीब, गरजू रुग्णांसाठी खुले होईल, अशी माहिती गुरुमाऊलींनी यावेळी दिली.