पंचवटी : तपोवनातील साधुग्रामच्या आरक्षित जागेवर अनधिकृतपणे झोपडपट्टी थाटून राहणाºया नागरिकांना जागा खाली करावी हे सांगण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकातील कर्मचाºयांवर झोपडपट्टीतील महिला तसेच लहान मुलांनी पाणी फेकून शिवीगाळ करीत पथकाला पळवून लावल्याचा प्रकार शनिवारी (दि.१०) दुपारी तपोवनात घडला. दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या सूत्रांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मनपा पंचवटी अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकावर झोपडपट्टी-धारकांनी दगडफेक करून धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत समजलेली माहिती अशी की, महापालिकेच्या वतीने सध्या अतिक्रमण मोहीम सुरू आहे. प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळयासाठी तपोवनात साधुग्रामसाठी जागा आरक्षित केली असून, या जागेवर गेल्या अनेक महिन्यांपासून झोपडपट्टीधारकांनी अतिक्र मण केले आहे.
अतिक्रमण विरोधी पथकाला पळवून लावले साधुग्राम : झोपडपट्टीधारकांकडून अरेरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:23 AM