येवला येथे संत नामदेव जन्मोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:05 AM2020-11-28T01:05:05+5:302020-11-28T01:05:35+5:30

येवला येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांची ७५०वी जयंती व संत नामदेव शिंपी समाज सेवा समिती या संस्थेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Saint Namdev's birth anniversary at Yeola in excitement | येवला येथे संत नामदेव जन्मोत्सव उत्साहात

येवला येथे संत नामदेव यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनप्रसंगी समाजबांधव.

googlenewsNext
ठळक मुद्देविविध कार्यक्रम : स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

येवला : येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांची ७५०वी जयंती व संत नामदेव शिंपी समाज सेवा समिती या संस्थेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह आरती, दीपोत्सव, चित्रकला स्पर्धा, घर तेथे रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. प्रारंभी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे ११ दांपत्य तसेच कापड व्यापारी सोमनाथ हाबडे व संत नामदेव शिंपी समाजाचे चिटणीस कैलास बकरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ७५० पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. शामाबाई लचके, सुशीला टिभे यांनी आरती म्हटली. विठ्ठलनामाच्या जयघोष व नामदेव महाराज यांचा जयजयकार करत महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. परिक्षक म्हणून किशोर सोनवणे, व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन पुरुषोत्तम रहाणे यांनी, तर आभारप्रदर्शन पांडुरंग खंदारे यांनी केले.

कार्यक्रमास जानकीराम शिंदे, कृष्णा पाथरकर, पोपट भांबोर, मनोहर टिभे, अरुण भांबारे, बळीराम शिंदे, श्याम गायकवाड, योगेश लचके, जगदीश खांबेकर, प्रदीप लचके, प्रमोद लचके, मोहन शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीचे अध्यक्ष मुकेश लचके, उपाध्यक्ष राम तुपसाखरे, कार्यवाहक राजेंद्र कल्याणकर, सहचिटणीस राजेंद्र गणोरे, खजिनदार कविता माळवे, संघटक अमोल लचके, सहसंघटक तुषार भांबारे, पंकज शिंदे, सिद्धेश माळवे, स्वप्निल गायकवाड, पंडित शिंदे, सुनील टिभे, विशाल तुपसाखरे, वरद लचके, अक्षय निरगुडे आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Web Title: Saint Namdev's birth anniversary at Yeola in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.