जुन्या पेन्शन योजनेसाठी पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:34+5:302021-07-05T04:10:34+5:30
येवला दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन शिक्षकांनी सदर निवेदन दिले. शिक्षण क्षेत्रातच फक्त विनाअनुदानित, अंशतः ...
येवला दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री भुजबळ यांची संपर्क कार्यालयात भेट घेऊन शिक्षकांनी सदर निवेदन दिले. शिक्षण क्षेत्रातच फक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तत्त्व आहे इतर विभागात हे तत्त्व लागू नसल्याने आमच्या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात आमचा प्रश्न मांडून आमच्यावरील अन्याय दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जुनी पेन्शन संघटना कोअर कमिटी राज्य संघटक व कोअर कमिटी सदस्य दिगंबर नारायणे, तालुका अध्यक्ष पोपट बारे, सचिव राजेंद्र बारे, हिरामण पगार, तुकाराम लहरे, संतोष दाभाडे, कानिफनाथ मढवई, सतीश पैठणकर, अर्जुन घोडेराव, शिवाजी भालेराव आदींसह शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - ०४ येवला पेन्शन
येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांना, जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीचे निवेदन सादर करताना संघटनेचे कोअर कमिटी राज्य संघटक दिगंबर नारायणे. समवेत तालुकाध्यक्ष पोपट बारे, सचिव राजेंद्र बारे, हिरामण पगार आदी.
040721\04nsk_14_04072021_13.jpg
येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांना, जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीचे निवेदन सादर करतांना संघटनेचे कोर कमिटी राज्य संघटक दिगंबर नारायणे. समवेत तालुका अध्यक्ष पोपट बारे, सचिव राजेंद्र बारे, हिरामण पगार आदी.