विणकरांना मदतीसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:07 PM2020-07-01T22:07:18+5:302020-07-01T23:08:33+5:30
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमंडळाने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमंडळाने केली आहे.
येवला शहर हे पैठणी उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र असून, एकमेव उत्पादक बाजारपेठ आहे. या उद्योगावर तालुक्यातील सुमारे पाच हजार कुटुंब अवलंबून असून, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात सर्व पैठणी उत्पादक विणकर, कारागीर व विक्रे ते या सर्वांचा धंदा बुडाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातील ८० टक्के कुटुंब हातावरचे असून, कच्चा मालाअभावी त्यांचे पैठणी विणकाम बंद पडले. गेल्या तीन महिन्यात आवक नसल्याने कच्चा मालाच्या खरेदीचे भांडवलही संपुष्टात आले आहे. परिणामी विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सदर निवदेनात म्हटले आहे. तसेच पैठणी कारागिरांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या मार्फत चालणारे पण आता बंद पडलेले रेशीम विक्र ी केंद्र तत्काळ सुरू करावे, प्रत्येक विणकर बांधवाला केंद्र सरकारच्या वतीने किमान १० किलो रेशीम अनुदान म्हणून देण्यात यावे, येवल्यातील गर्दी लक्षात घेता पर्यटन विकास महामंडळाचे मोकळे गाळे येवल्याच्या विणकरांना विनामोबदला खुले करून देण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. खासदार पवार यांनी मदत मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आनंद शिंदे, आदर्श बाकळे, स्वप्निल करंजकर, नितीन काळण, श्रावण जावळे उपस्थित होते.