देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:47 AM2019-10-21T00:47:44+5:302019-10-21T00:48:32+5:30
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान ंकेंद्र उभारण्यात आले आहे.
नाशिकरोड : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी दुपारी सर्व २५५ मतदान खोल्यांमधील मतदानयंत्रे, साहित्य व कर्मचारी बसेस व खासगी वाहनांमधून रवाना करण्यात आले. दरम्यान, कॅन्टोन्मेंटमधील धोंडीरोडवरील देवळाली हायस्कूलमध्ये सखी मतदान ंकेंद्र उभारण्यात आले आहे.
देवळाली विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुर्गा उद्यानाशेजारील मनपाच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रशासन यंत्रणा कार्यरत आहे. मतदारसंघातील ९७ मतदान केंद्रावरील २५५ मतदान खोल्यांमध्ये मतदानयंत्रे, साहित्य, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड यांना बसेसमधून रवाना करण्यात आले. ३२० पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्ताचे कर्तव्य बजावणार आहेत.
दुर्गा उद्यान ते मुक्तिधामपर्यंत सकाळपासून दुपारपर्यंत दुतर्फा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अन्य मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. ३८ बसेस व शंभर खासगी जीप मतदानप्रक्रि येसाठी वापरण्यात आल्या असून, २१११ अधिकारी व कर्मचारी यांची वाहतूक करण्यात आली.