बनावट अगरबत्तीची विक्री दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:13 AM2018-03-02T01:13:35+5:302018-03-02T01:13:35+5:30
मालेगाव : २१ हजार ७५० रुपये किमतीचे धूप छाप कंपनीचे कम्फर्ड बनावट अगरबत्तीचे २५० बॉक्स बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाºया दोघा व्यापाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मालेगाव : सोयगाव मार्केटमधील बालाजी ट्रेडर्स व पराग सेल्स या दुकानांमध्ये २१ हजार ७५० रुपये किमतीचे धूप छाप कंपनीचे कम्फर्ड बनावट अगरबत्तीचे २५० बॉक्स बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाºया दोघा व्यापाºयांविरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी (दि. २७) सकाळी साडेसहा ते आठ वाजेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. ठाणे येथील प्रमोद रवींद्र सोनार या अधिकाºयाने फिर्याद दिली. रवींद्र भालचंद्र सोनी (४०) पटेलनगर, सटाणानाका व संदीप गुलाबचंद बडजाते (४०) रा. हनुमानवाडी, सोयगाव मार्केट यांनी त्यांच्या मालकीचे बालाजी ट्रेडर्स व पराग सेल्स या दुकानामध्ये २१ हजार ७५० रुपये किमतीचे धूप छाप अॅण्ड कंपनी या कंपनीचे कम्फर्ड बनावट अगरबत्तीच्या संदर्भातील कोणतेही कागदपत्र अथवा स्वामीत्व हक्क नसताना बेकायदेशीरपणे दुकानात ठेवून विक्री करताना मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक तिगोटे करीत आहेत.