जनावरांसाठी लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 03:49 PM2020-10-21T15:49:25+5:302020-10-21T15:50:02+5:30
सिन्नर :तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून तालुक्यासाठी 82 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. आजपावेतो तालुक्यातील 19 हजार जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉ मिलिंद भणगे यांनी दिली आहे.

लाळ खुरकूत रोगमुक्त पट्टा उपक्रमाअंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे. लाळ खुरकूत हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून नियमितपणे लसीकरण मोहीम राबवण्यात येते. यंदाही मोहीम राबवण्यात येत असून विभागाने नियोजन केले आहे. तालुक्यातील पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व गो वर्गीय जनावरांना कानात आधार नंबर चे बिल्ले कानात मारुन घेऊन लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधून आपल्या पशुधनास ओळख निर्माण करून घ्यावी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ मिलिंद भणगे यांनी केले आहे.