५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:45 AM2019-10-24T00:45:11+5:302019-10-24T00:45:50+5:30

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मतदानाच्या वेळेत संबंधितांना शहरात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

 समज Police understand the gangsters leaving the city | ५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

Next

नाशिक : विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: मतदानाच्या वेळेत संबंधितांना शहरात उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहितेच्या महिनाभराच्या कालावधीत एकूण ५५ गुंडांना शहराच्या परिमंडळ-२मधून तडीपार केले आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५५१ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (दि.२४) शहर सोडणे बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. तसेच सातपूरमधील संघटितपणे गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या कल्पेश दीपक वाघ याच्यासह त्याच्या साथीदारांनाही शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर ९ गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आल्याचे सहायक आयुक्त समीर शेख यांनी सांगितले.

Web Title:  समज Police understand the gangsters leaving the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.