उपनगर : दासबोध हा सामान्य ग्रंथ नसून दासबोध ग्रंथ हा सांगता सांगताच कळतो. त्यामुळे दासबोधाचे माहात्म्य सांगणे हीच खरी भक्ती आहे. अंधकारात गेलेला समाज आज चांगल्या दिवसांच्या प्रकाशपर्वापर्यंत येऊन पोहचला हीच समर्थ रामदास स्वामींच्या सर्वोत्तम विद्येची प्रचिती असल्याचे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले. आगर टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठात ‘समर्थांची सर्वोत्तम जीवन विद्या’ या विषयावर व्याख्यान देताना स्वामी गोविंददेव म्हणाले की, मराठीसारखे संतसाहित्य कुठल्याही भाषेत नाही. समर्थांच्या संपूर्ण जीवनाचा सार दासबोध या ग्रंथात मिळतो. दासबोध ग्रंथ हा एकमेव मराठी भाषेतील ज्वलंत ग्रंथ आहे. जे दासबोधात आहे ते अन्यत्र कुठेही नसल्याचे स्वामींनी सांगितले. यावेळी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, विजया माहेश्वरी, दिलीप कैचे, प्रकाश पवार, प्राचार्य राम कुलकर्णी, नगरसेवक शाहू खैरे, विश्वास ठाकूर, त्र्यंबकराव गायकवाड, भालचंद्रशास्त्री शौचे, अनिल बूब, रवींद्र मणियार, प्रदीप बूब, श्रीपाद कुलकर्णी, रत्नाकर आणेकर आदी उपस्थित होते. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांंचे श्री समर्थ रामदास स्वामींची सर्वोत्तम जीवन विद्या या विषयावर व्याख्यान मंगळवारपर्यंत (१४ मार्च) सकाळी ८.३० ते ११ या वेळेत होणार आहे.
समर्थांचा दासबोध हा भक्तीचा सागर गोविंददेव गिरी महाराज : रामदास स्वामी मठात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:08 AM
उपनगर : दासबोध हा सामान्य ग्रंथ नसून दासबोध ग्रंथ हा सांगता सांगताच कळतो. त्यामुळे दासबोधाचे माहात्म्य सांगणे हीच खरी भक्ती आहे.
ठळक मुद्देमराठीसारखे संतसाहित्य कुठल्याही भाषेत नाहीस्वामींची सर्वोत्तम जीवन विद्या या विषयावर व्याख्यान