समता परिषद बैठक : मार्चमध्ये फुंकणार आंदोलनाचे रणश्ािंग आगामी अधिवेशनावर भुजबळ समर्थकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:51 AM2018-02-05T00:51:10+5:302018-02-05T00:51:44+5:30

नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ विधीमंडळावर मोर्चा काढण्याचा निर्णय समता परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

Samata Parishad meeting: A rally of the Bhujbal supporters rally in the month of March, in the forthcoming convention of Bhujbal | समता परिषद बैठक : मार्चमध्ये फुंकणार आंदोलनाचे रणश्ािंग आगामी अधिवेशनावर भुजबळ समर्थकांचा मोर्चा

समता परिषद बैठक : मार्चमध्ये फुंकणार आंदोलनाचे रणश्ािंग आगामी अधिवेशनावर भुजबळ समर्थकांचा मोर्चा

Next
ठळक मुद्दे विराट मोर्चा काढण्यात येणार सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी

नाशिक : बहुजन समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या मार्च महिन्यात विधीमंडळावर मोर्चा काढण्याचा निर्णय समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. मोर्चासाठी भुजबळ समर्थक असलेले सर्वपक्षीय आणि जातीधर्माचे लोक सहभागी होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. शहरातील टाकळीरोड येथील जयशंकार फेस्टिव्हल लॉन्स येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशन काळात मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व पक्षांतील भुजबळांचे समर्थक असलेले आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेत्यांची राज्यस्तरीय समिती नियुक्त करून मोर्चाची तारीख जाहीर केली जाईल, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. मोर्चासाठी समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष व पदाधिकाºयांना प्रत्येक जिल्ह्णात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच विभागीय स्तरासह प्रत्येक जिल्ह्णात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेऊन हा मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी आमदार जयवंत जाधव, अ‍ॅड. कृष्णा यादव, अ‍ॅड. सुभाष राऊत, प्रशांत शिंदे, सुनील भुसारा, बाळासाहेब कर्डक, दशरथ फुले, नवनाथ वाघमारे, डॉ. डी. एन. महाजन, अ‍ॅड. सुभाष मौर्य, संदीप खरात, प्रदीप वैद्य यांची भाषणे झाली. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व पदाधिखाºयांना मोर्चा यशस्वी करण्याची शपथ देण्यात आली.
दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये राबविण्यात येत असलेले भुजबळ समर्थक जोडो अभियान आणि अन्याय पे चर्चा हा कार्यक्र म राज्यभर राबविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. मुंबईत निघणारा हा मोर्चा कुठल्या एका समाजाचा किंवा संघटनेचा मोर्चा नाही. यात सर्व जातीधर्माचे, पक्षाचे, सामाजिक संस्थांचे लोक सहभागी होतील, असे कृष्णकांत कुदळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

Web Title: Samata Parishad meeting: A rally of the Bhujbal supporters rally in the month of March, in the forthcoming convention of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.