जिल्ह्यातील मृत पक्ष्यांचे नमुने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 01:34 AM2021-01-23T01:34:04+5:302021-01-23T01:35:03+5:30
जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्यकीय चिकित्सा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील पोल्ट्रीचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील काही भागात आढळलेले मृत कावळे आणि अन्य पक्षी यांचे नमुने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून, या पक्ष्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. असे असले तरी हे सर्व पक्षी स्थलांतरित असल्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे पशुवैद्यकीय चिकित्सा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील पोल्ट्रीचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी बर्ल्ड फ्लू पसरत असतानाच नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी तसेच नाशिकरोड परिरसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती. या पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले हेाते. प्राथमिक तपासणीनंतर अहवाल पुढील तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयेागशाळेत पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी हेच नमुने प्राप्त झाले असून, मालेगाव वगळता अन्य नमुने पॉझिटिव्ह आलेले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. नमुने पॉझिटिव्ह आलेले असले तरी जिल्ह्यातील बर्ड फ्लूचा धोका नसल्याचेही सांगण्यात आले. ज्या भागातून नमुने पाठविण्यात आले होते.