नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाºयांच्या विरोधात प्रशासनाने मोहीम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणाºया वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे. असे असले तरी, वाळू माफियांकडून चोरी, छुप्या पद्धतीने बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी व त्यातून पाच पट दंडाची वसुली करण्यासाठी महसूल खात्याने पथक गठीत केले आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या हद्दीत असे पथके कार्यान्वित असून, त्यांच्याकडून दिवस-रात्र महत्त्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवून गौणखनिजाचे वाहतूक करणारे वाहने पकडली जात आहे. नाशिक तालुक्याच्या पथकाने अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एम. एच. ०४ एफ ४०८२ व एमएच ०४ एफडी ८७०३ ही वाहने पकडून नाशिक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली होती. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाºयांनी या गाड्यांचे पंचनामे करून वाहतूकदाराला पाच लाख रुपये दंड भरण्याची नोटीसही दिली होती. परंतु दंड न भरताच प्रशाासनाची नजर चुकवून सदरच्या दोन्ही मालट्रक वाळू माफियांनी पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे पकडलेल्या गाड्या दंड न भरताच पळून गेल्याची बाब नाशिक तहसील व प्रभारी प्रातांच्या निदर्शनास दोन दिवसांनी आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही घटनाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी नाशिक तहसील कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक व प्रिंटर चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रांत अधिकाºयांनी नाशिक तहसील आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत व स्वत: तहसील कार्यालयानेही कॅमेरे लावलेले असताना आवारातून अवजड दोन मालट्रक पळवून नेण्यात आले आहेत.