वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:55 PM2018-02-17T14:55:33+5:302018-02-17T14:57:42+5:30

शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे

Sand Mafioni took away trains from Nashik District Collectorate | वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

Next
ठळक मुद्दे पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली

नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणा-यांच्या विरोधात प्रशासनाने मोहिम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.
शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे. असे असले तरी, वाळू माफियांकडून चोरी, छुप्या पद्धतीने बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी व त्यातून पाच पट दंडाची वसुली करण्यासाठी महसूल खात्याने पथक गठीत केले आहेत. प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या हद्दीत असे पथके कार्यान्वित असून, त्यांच्याकडून दिवस-रात्र महत्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवून गौणखनिजाचे वाहतूक करणारे वाहने पकडली जात आहे. नाशिक तालुक्याच्या पथकाने अशाच प्रकारे काही दिवसांपुर्वी एम. एच. ०४ एफ ४०८२ व एम. एच. ०४ एफडी ८७०३ ही वाहने पकडून नाशिक तहसिलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली होती. संबंधित तलाठी व मंडळ अधिका-यांनी या गाड्यांचे पंचनामे करून वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली होती. परंतु दंड न भरताच प्रशाासनाची नजर चुकवून सदरच्या दोन्ही मालट्रक वाळू माफियांनी पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे पकडलेल्या गाड्या दंड न भरताच पळून गेल्याची बाब नाशिक तहसिल व प्रभारी प्रातांच्या निदर्शनास दोन दिवसांनी आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापुर्वी नाशिक तहसिल कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक व प्रिंटर चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रांत अधिका-यांनी नाशिक तहसिलच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यालयाच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत व स्वत: तहसिल कार्यालयानेही कॅमेरे लावलेले असताना आवारातून अवजड दोन मालट्रक पळवून नेण्यात आल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Sand Mafioni took away trains from Nashik District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.