हरिश्चंद्रगड परिसरात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 01:23 PM2020-03-02T13:23:56+5:302020-03-02T13:24:05+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ट्रेकींगवीरांनी पौराणिक पाशर््वभूमी व शिवकालीन इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातील अकोला येथे असलेल्या हरिश्चंद्र गडावरील परिसरात स्वच्छता करत स्वच्छता अभियान राबविले.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ट्रेकींगवीरांनी पौराणिक पाशर््वभूमी व शिवकालीन इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातील अकोला येथे असलेल्या हरिश्चंद्र गडावरील परिसरात स्वच्छता करत स्वच्छता अभियान राबविले.
गडाचे जतन व्हावे, गड परिसरातील वनसंपदा कायम राहावी, पर्यावरण संवर्धन व्हावे, या दृष्टीने नांदूरवैद्य येथील ग्रामस्थ स्वच्छता मोहीम राबवित आहे. परंतू या महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या या हरिश्चंद्र गडावर दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या अधिक वाढत असून या ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे, तसेच येथील मुर्तीची अवस्था अतिशय बिकट झाली असून संबंधित पुरातन विभागाचे दुर्लक्ष असल्याने याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून पडलेल्या अवस्थेत असणारी मंदिरांची पुन्हा दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी पर्यटक करीत आहे. त्याचप्रमाणे संबंधित प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी पाय-यांची व्यवस्था करण्यात यावी. व या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात यावी. यानंतर या नांदूरवैद्य येथील युवकांनी गडावरील कचरा व रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या देखील खाली आणल्या. व या कच-याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात माजी सैनिक तुकाराम काजळे, अनिल मुसळे, सुनिल मुसळे, गणेश मुसळे, दिनेश दवते, मारूती डोळस, अनिल धांडे, किरण मुसळे, प्रशांत धुमक, गुलशन गोडसे, किसन काजळे, जगदीश गोडसे सहभागी झाले होते.