महापालिकेकडून शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:47+5:302021-02-21T04:29:47+5:30
मार्च महिन्यात स्वच्छ शहर सर्वेक्षण असून त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. मात्र, नियमित स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन सध्या लोकसहभागातून ...
मार्च महिन्यात स्वच्छ शहर सर्वेक्षण असून त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. मात्र, नियमित स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन सध्या लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. शनिवारी (दि.२०) सकाळी ६ ते ९ असे तीन तास स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी आयुक्त कैलास जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, घन कचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्यासह अन्य सर्वच खाते प्रमुखांनी सहभाग घेऊन परिसर साफ केला. महामार्ग बस स्थानक परिसरातून २०४५ किलो कचरा जमा करण्यात आला.
दरम्यान, सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिकरोड, पूर्व नाशिक या भागात देखील मोहीम राबवण्यात आली. यात नाशिकरोड विभागात ११.१५० टन, पूर्व विभागात ७ टन, पश्चिम विभागातून साडेतीन टन, पंचवटी विभागातून अडीच टन, सिडको विभागातून ८ टन आणि सातपूर विभागातून तीन टन असा एकूण ३६ टन कचरा उचलण्यात आला. या मोहिमेत नाशिक ब्लॉगर ग्रुप, रेम्बो ग्रुप, नमादी गोदा ग्रुप, सैफी ट्रस्ट दाऊदी बाेहरा समाज, मिशन विघ्नहर्ता ग्रुप, नाशिककर ग्रुप अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या.
===Photopath===
200221\20nsk_57_20022021_13.jpg
===Caption===
महापालिकेच्या वतीने मुंबई नाका येथे आयोजित स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले आयुक्त कैलास जाधव, समवेत अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे व इतर अधिकारी