सॅनिटायझर सेवन जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:57+5:302021-04-19T04:13:57+5:30
इंदिरानगर : निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला आपल्या प्राणाला मुकावे लागण्याची धक्कादायक घटना घडली ...
इंदिरानगर : निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर प्राशन केल्याने इंदिरानगर भागातील एका पुरुषाला आपल्या प्राणाला मुकावे लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. अविनाश मोरे (39) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची ठरत असून वारंवार हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा सॅनिटायझरचा वापर वाढला आहे.
वडाळा पाथर्डी रस्त्यावर असलेल्या श्रीगणेशाय अपार्टमेंटमधील रहिवाशी अविनाश मोरे यांना गेल्या रविवारी(दि.4) छातीत दु:ख जाणवू लागल्याने त्यांनी राहत्या घरी सॅनिटायझरचे सेवन केले. यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने नातेवाईकांनी मोरे यांना औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचार सुरु असताना शनिवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी नोंद केली आहे.