नाशिक : मागील आठवड्यात गोवा येथील राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने मुंंबई मॅरेथॉन स्पर्धाही जिंकली. संजीवनीची मार्गदर्शक असलेली मोनिका आथरे हिला मागे टाकत संजीवनीने प्रथम क्रमांक मिळविला. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत महिलांच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या महिला खेळाडंूंनी पुन्हा एकदा वर्चस्व राखत नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. कविता राऊत आणि मोनिका आथरे यांनी यापूर्वी या स्पर्धा जिंकल्या असून, मोनिका ही मागील मॅरेथॉनची विजेती आहे. रविवार, दि. २१ रोजी झालेल्या मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरमध्ये संजीवनी जाधव हिने १:२६:२४ सेकंदांची नोंद करून प्रथम क्रमांक मिळविला, तर मोनिका आथरे ही दुसºया क्रमांकावर राहिली. मोनिकाने १:२७:१५ सेकंद वेळेची नोद केली. संजीवनी आणि मोनिका यांच्यात अखेरच्या अंतरापर्यंत चुरस पाहायला मिळाली. २०१६ मध्ये संजीवनीने वसई विरारची मॅरेथॉन जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या स्पर्धेत तिने गतविजेती स्वाती गाढवेचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित केला. मुंबई मॅरेथॉनमध्येही तिने गतविजेत्या मोनिका आथरेचा अवघा एक मिनिट काही सेकंदांनी पराभव करून मुंबई मॅरेथॉनवर नाव कोरले. दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाºया मोनिकोला संजीवनीने कडवी झुंज देत मुंबई मॅरेथॉन जिंकली. मागील आठवड्यात गोवा येथे झालेल्या राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीने आॅलिम्पिकपटू ललिता बाबर हिला मागे टाकत क्रॉसकंट्री स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. गोवा येथील यशस्वी कामगिरी करीत लगोलग मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या संजीवनी जाधववर कोणताही ताण जाणवला नाही. जिंकण्याच्या इर्षेने धावलेली संजीवनी विजेतेपद मिळवूनच थांबली. संजीवनीने या वर्षीच्या पहिल्या महिन्यातच दोन मोठ्या स्पर्धांवर आपले नाव कोरले. संजीवनीने मागील वर्षीच्या विजयाचा सिलसिला यंदाही कायम ठेवला आहे. मागीलवर्षी गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे खुल्या गटात दहा हजार मीटर धावण्याच्या या स्पर्धेत संजीवनी जाधव हिने ३३.१४.१६ या विक्रमी वेळेत हे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून याआधी केलेला (३३.३३) विक्रम मोडीत काढत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेतही संजीवनीने रौप्य पदकाची कमाई केली होती. ंइंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट््स फेडरेशन यांच्यातर्फे चीन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ स्पर्धेतही तिने हिने रौप्य पदक मिळविले आहे. संजीवनी जाधव हिने युनिव्हर्सिटी स्पर्धेत महाराष्ट्राला पहिल्यांदाच पदकाचा मान मिळवून दिला आहे. संजीवनीने आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ब्राँझ पदक तसेच भुवनेश्वर येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारी संजीवनी ही कविता राऊतनंतर आशियाई स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकणारी दुसरी धावपटू आहे. कविता, मोनिकाची परंपरा जपणारी संजीवनीआशियाई युवा, ज्युनिअर, विश्व विद्यापीठ, असा प्रवास करत संजीवनी या टप्प्यापर्यंत पोहचली आहे. कविता राऊत, मोनिका आथरे या धावपटूंची परंपरा ती पुढे नेत आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धेत सलग तीन वर्षे पाच व दहा हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाºया मॅरेथॉनमध्येही दबदबा निर्माण केला आहे. संजीवनी जाधव ही भोसला मिलिटरी स्कूलची विद्यार्थिनी असून, तिला महिंद्राने पुरस्कृत केले आहे. ती भोसला महाविद्यालयातील भारत सरकारच्या साई केंद्रात प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
संजीवनीची ‘मॅरेथॉन’ कामगिरी ; मुंबई अर्धमॅरेथॉन जिंंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:46 AM