सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची  सांगतादेवीभक्त परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:33 AM2019-04-20T00:33:49+5:302019-04-20T00:34:14+5:30

सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची चैत्र पौर्णिमला सांगता झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेले खान्देश भागातील भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत.

 Saptashrungi Devi's Chaito Savarkha Deviya Bhakta's return journey | सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची  सांगतादेवीभक्त परतीच्या प्रवासाला

सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची  सांगतादेवीभक्त परतीच्या प्रवासाला

googlenewsNext

कळवण : सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाची चैत्र पौर्णिमला सांगता झाली. आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेले खान्देश भागातील भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत.
शुक्रवारी सकाळी ७ वाजता न्यासाच्या कार्यालयातून ढोलताशाच्या गजरात श्री भगवतीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा न्यायाधीश रवींद्र जोशी यांनी सपत्नीक देवीची महापूजा केली. यावेळी न्यासाचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट विभागप्रमुख प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यासह विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
दर वर्षी नांदुरी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खान्देशातील धुळे, जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, नवापूर आदी भागातील भाविक दरवर्षी मोठ्या प्रमाणात पायी यात्रेसाठी येतात. गेल्या चार-पाच दिवसांपासून नांदुरी गडाकडे जाणारे रस्ते या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. उन्हाची पर्वा न करता अनेक भाविक गडाच्या दिशेने चालत होते. यामुळे रस्त्यावर भक्तिमय वातावरण दिसून येत होते. खान्देश हे देवी सप्तशृंगी देवीचे माहेर आहे आणि कळवण सासर असल्याने खान्देशचे भाविक गडावर ध्वज फडकेपर्यंत दर्शन करून नंतर परतीच्या मार्गाला लागतात. कारण खान्देशवासी फडकलेला ध्वज पाहत नाहीत, आशी आख्यायिका आहे. हे भाविक आता परतीच्या मार्गाला लागले आहेत.
यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, न्यासाचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, संजय कुलकर्णी, भिकन वाबळे, प्रकाश पगार, नामदेव गांगुर्डे, पंडित कळमकर, श्रीराम कुलकर्णी, भरत शेलार, श्याम पवार, मुरलीधर गावित, सागर निचित, गोविंद निकम, विठ्ठल जाधव, जगतराव मुंदलकर, उत्तम शिंदे, डॉ. बिरारे, विभागप्रमुख लक्ष ठेवून होते.

Web Title:  Saptashrungi Devi's Chaito Savarkha Deviya Bhakta's return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.