सराफांची महापालिकेविरोधात जनहित याचिकेची तयारी ; फूल बाजार हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 02:35 PM2019-10-09T14:35:06+5:302019-10-09T14:45:55+5:30
सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरवार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : गेल्या दोन महिन्यात दोनदा सराफ बाजार पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी आता महापालिकेविरोधात कायदेशीर लढा देण्याची तयारी केली असूून त्यासाठी व्यापारी व पर्यावरण अभ्यासकांची तज्ज्ञ समिती नेमूण ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांच्या बुधवारी (दि.९)बैठकीत घेण्यात आला आहे.
सराफ बाजारात आगस्ट महिन्यात पहिल्याच रविवारी गोदावरीला आलेल्या महापुराने सराफ बाजारात पाणी घुसून अनेक सराफी पेढ्या पाण्याखाली गेल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच आपत्तीची परतीच्या जोरदार पावसामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ६ ऑक्टोबरला गोदावरीला पूर नसतानाही सराफ बाजारात तीन ते चार फूट पाणी साचून अनेक दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे पुन्हा मोठे नूकसान झाले. त्यामुळे व्यापाºयांमध्ये महापालिका व्यवस्थापनाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून ही पूरपरिस्थिती भूयारी गटार आणि पावसाळी नाल्यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने उद्भवत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे सराफ बाजारात बसणाऱ्या फुलविक्रेत्यांचे या भागात मोठ्या प्रमामात अतिक्रमण असून त्यांच्यामुळे सराफ व्यावसायिकांना वाहतूक कोंडीसह वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत पर्यावरण प्रेमी व अभ्यासक देवांग जाणी, समीर गायधनी. हेमंत जगताप, नाशिक सराफ असोसिएश्नचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, घाऊक किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, मेहूल थोरात, सचीन वडणेरे, गिरीश नवसे, फेरीवाला व्यस्थापनसमितीचे राजेंद्र दिंडोरकर आदिंचा समावेश असून ही समिती सराफ बाजारातील पूर परिस्थिती आणि अतिक्रमाणांचा सर्वांगीन अभ्यास करून तीस दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.