स्त्रीभ्रूणहत्या रोखणे काळाची गरज सरपोतदार : प्रभाग २५ मध्ये कन्यारत्न असलेल्या महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:12 AM2018-03-10T01:12:46+5:302018-03-10T01:12:46+5:30

सिडको : प्रत्येक महिलेने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील क्षमतेचा पुरेपूर वापर करावा व आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे. महाराष्टÑातही स्त्रीभ्रूणहत्येचे लोण पसरले असून, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.

Sarpotdar needed for prevention of female feticide: In honor of women in Viral 25 | स्त्रीभ्रूणहत्या रोखणे काळाची गरज सरपोतदार : प्रभाग २५ मध्ये कन्यारत्न असलेल्या महिलांचा सन्मान

स्त्रीभ्रूणहत्या रोखणे काळाची गरज सरपोतदार : प्रभाग २५ मध्ये कन्यारत्न असलेल्या महिलांचा सन्मान

Next
ठळक मुद्देदोन मुली असलेल्या ५५० महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे पुढे राहावे

सिडको : प्रत्येक महिलेने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील क्षमतेचा पुरेपूर वापर करावा व आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे. महाराष्टÑातही स्त्रीभ्रूणहत्येचे लोण पसरले असून, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. महिलांनी खचून न जाता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे पुढे राहावे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या शिवसहकार सेना अध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांनी केले. सिडकोतील प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना नगरेसवक हर्षा बडगुजर यांनी महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी सरपोतदार बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उत्तर महाराष्टÑ संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, पश्चिम मतदारसंघाचे नीलेश चव्हाण, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, युवा सेनेचे शंकर पांगरे, नगरसेवक कल्पना पांडे, अ‍ॅड. शामला दीक्षित, हर्षा गायकर, वनिता देशमुख, नयना गांगुर्डे आदी उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून ज्या घरात कन्यारत्न हर्षा बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दोन मुली असलेल्या ५५० महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोपी गिलबिले, पवन मटाले, रमेश जावरे, त्र्यंबक गांगुर्डे, नाना निकम, जगन्नाथ निकम, गोपीनाथ सोनवणे, शांताराम ठाकरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले.

Web Title: Sarpotdar needed for prevention of female feticide: In honor of women in Viral 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.