नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, नाशिक जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यासाठी नाशिक तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाºयांची दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाच भरू लागली आहे. आॅनलाइन प्रणालीने सातबारा उताºयाचे ‘री-ईडीट’चे काम करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तलाठ्यांनी आॅफलाइन कामकाज सुरू केले असून, ते कितपत यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतकºयांना बसू लागला आहे. तथापि, जनतेच्या त्रासाविषयी देणे-घेणे नसलेल्या प्रशासन व्यवस्थेने तलाठ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. संगणकीय सातबारा उतारा देण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी पायाभूत सुविधा देण्यात शासनानेच हात अखडता घेतला आहे. प्रारंभी सदरचे काम करण्यास नाखूष असलेल्या तलाठ्यांनी संगणकीय सातबारा उताºयाचे कामकाज सुरू केल्यानंतर त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील दोष दूर करण्यात बराच कालावधी उलटल्यानंतर सर्व्हर डाउन होण्याचेप्रकार घडल्याने तलाठ्यांना मध्यरात्री उठून कामे करावी लागली. परंतु तरीही हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.नाशिक तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वादोन लाख खातेदार असून, त्यांच्या सातबाºयाचे संगणकीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यातील चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या ‘री-ईडीट’ मॉड्युलमध्ये सुरू आहे. आॅनलाइनप्रणालीने सदरचे काम करावे लागत असले तरी, त्यासाठी इंटरनेटचा स्पीड व सर्व्हरचा प्रश्न कायम असल्यामुळे नाशिक तालुक्याचे दहा टक्केही कामकाज झालेले नाही. अशा परिस्थितीत तलाठी व मंडळ अधिकाºयांना शासनाच्या महसुलाशी संबंधित सर्व कामे बाजूला सारून निव्वळ सातबारा संगणकीकरणाच्या कामात जुंपण्यात आले असून, ४२ तलाठी व ८ मंडळ अधिकारी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयाच्या वरच्या सभागृहात लॅपटॉपवर कामे करीत आहेत.आॅफलाइन पद्धतीने काम करीत असतानाही दिवसभरातून जेमतेत वीस ते पंचवीस सातबारा उताºयाचेच काम पूर्ण होत आहे.अवघ्या चार तलाठ्यांना लॅपटॉपसंगणकीय सातबारा उताºयाचे काम करणाºया तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप देण्यात येईल, अशी घोेषणा करून तीन ते चार वर्षे उलटली, परंतु तलाठ्यांच्या हाती लॅपटॉप लागले नाहीत, उलट सातबारा संगणकीय करणाच्या कामाचे ओझे वाहणाºया तलाठ्यांनी स्वत:च्या खिशाला तोशीस लावून स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी केले. काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दोन कोटी रुपये खर्च करून ३५७ लॅपटॉप शासनाच्या माध्यमातून खरेदी केले, परंतु नाशिक तालुक्यातील अवघ्या चार तलाठ्यांनाच त्याचे वाटप करण्यात आले आहे. अन्य तलाठी अद्याप लॅपटॉपच्या प्रतीक्षेत आहेत.
सातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस तलाठ्यांची भरली ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:02 AM
नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
ठळक मुद्दे ‘री-ईडीट’चे काम करताना तांत्रिक अडचणीआॅफलाइन कामकाज सुरू