गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 11:32 PM2021-04-07T23:32:21+5:302021-04-08T00:52:41+5:30
देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडू लागले होते. पिके पाण्याअभावी करपू लागली होती. दरवर्षी गिरणा नदीचे पाणी जानेवारी महिन्यापर्यंत वाहाते, परंतु चालू वर्षी डिसेंबर महिन्यापासून गिरणा नदीचे पाणी कमी होऊन हळूहळू नदीपात्रातील पाणी कमी होऊ झाल्याने जानेवारी महिन्यातच गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टँचाई जणू लागली होती. फेब्रुवारी महिन्यात गिरणा नदीला पाणी सोडण्यात आले होते. परंतु पाणी बंद केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात नदीपात्रातील पाणी कमी झाले आणि नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवू लागली होती. गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीपात्रालागत विहिरी खोदून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन केल्या आहेत. तेव्हा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने नदी काठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासवून लागली होती.
पिकांना मुबलक पाणी
देवळा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड उशिरा केली आहे. परंतु नदीपात्रात कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरड्या झाल्याने पिकांना पाणी कसे घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. तसेच शिवारातील विहिरी कोरड्या झाल्याने गाई, मेंढ्या, बकऱ्या आदींना पाणी कोठे पाजावे, हा प्रश्न पशुपालकांना पडला होता. परतू गिरणा नदीला पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा सध्या तरी सुटला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाला आहे.