सिंगल फेज रोहित्र जोडल्याने ग्रामस्थात समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 06:26 PM2019-08-29T18:26:56+5:302019-08-29T18:27:47+5:30
औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
प्रभाव लोकमतचा
औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
याबाबतचे वृत बुधवारी (दि.२८) लोकमतमधे फोटो सह प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी विज वितरण कंपनीकडुन तात्काळ कार्यवाही करु न दखल घेऊन गावात सिंगल फेज योजनेचे रोहित्र जोडले गेल्याने शेतकºयांचा पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथील गावात सिंगल फेज योजनेच पंधरा दिवसात दोन वेळेस रोहत्र जळाले होते.
आठ दिवसापुर्वी एक डिपी जळाली होती. सिगंल फेज योजना कार्यान्वीत नसल्याने फवारणी करता येत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत होते.
लोड शेडींगचा दाब जास्त असल्याने हे डबे जळत असल्याचे वीज कंपनीचे म्हणने आहे. मात्र जास्त विजेचा दाब वाढल्यास हे डबे केव्हा जळतील याचा भरोसा नसल्याने गांवात केव्हा ही अंधार पडु शकतो असे ग्रामस्थांचे म्हणने होते व ऐन पोळा सणाच्या दिवशी गांव अधाराच्या सावटाखाली होते व पोळा सण साजरा होईल की नाही हया संभ्रामात ग्रामस्थ होते.
पिठाच्या गिरण्या मोटारी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता विज कंपनीने जादा केव्हीचे ट्रान्सफॉर्मर विजेचा सिंगल फेज योजनेचे डबे जोडावे अशी मागणी नागरीकांकडुन होत होती अखेर गांव प्रकाशमय होऊन व्वहार सुरळीत सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
चौकट.....
डीपी जळाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात होते. गेल्या पंधरा दिवसात सिंगल फेज योजनेचे दोन वेळेस रोहित्र जळाले, त्यामुळे गांवातील पिठाच्या गिरण्या व शेतकºयांच्या मोटारी, पिण्याचे पाणी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता.
विज कंपनीच्या अधिकाºयांना कळवूनही उडवा उडवीचे उतर देऊन दुर्लक्ष केले जात होते, ऐन पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. मात्र हे डीपी केव्हा जळेल याचा भरोसा नसल्याने विज कंपनीने जास्त विजेचा ट्रान्सफार्मर जोडल्यास कायमस्वरुपी ही समस्या मिटेल.
- गणेश निकम, ग्रामस्थ, औंदाणे.