नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यातील सटाणा नगरपालिकेच्या एका जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६-अ मधून शहर विकास आघाडीकडून पोपटराव सोनवणे हे निवडून आले होते. दीड महिन्यापूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. राज्य आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमात सटाण्यासाठीही मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी शुक्रवारी (दि. ९) जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. राज्य आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे.आयोगाच्या कार्यक्रमानुसार दि. १२ ते १९ मार्चदरम्यान निवडणुकीसाठी नामांकन दाखल करता येणार असून, २० मार्च रोजी छाननी व २६ मार्च रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. दि. ६ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून, दुसºया दिवशी ७ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाईल.
सटाणा नगरपालिकेची पोटनिवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:48 AM
नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यातील सटाणा नगरपालिकेच्या एका जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर६ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान