सातपुर पोलिसांकडून ४३ दिवसांत साडेआठ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:24+5:302021-05-04T04:07:24+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक कारणांकरिताच घराबाहेर पडण्याचेही आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक कारणांकरिताच घराबाहेर पडण्याचेही आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तरीही बहुतांश नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याचे लक्षात येताच सातपूर भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली नाकाबंदी अधिकाधिक कडक करण्यास सुरुवात केली गेली. पोलिसांनी १८ मार्चपासून १ मेपर्यंत एक हजार ३२९ नागरिकांवर कारवाई केली.
सातपूर परिसरातील पोलीस ठाणे सर्कल, रिलायन्स पेट्रोल पंप आणि अशोकनगर या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या १ हजार ६०० नागरिकांची महानगरपालिकेच्या मदतीने अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ५० नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. त्यांची कोविड केअर सेंटरला रवानगी करण्यात आली आहे.
--इन्फो--
या कारणांमुळे कारवाई
विना मास्क फिरणे, सामासिक अंतर न पाळणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, सार्वजनिक जागेत थुंकणे, रस्त्यावर हातगाडी लावणे, टपऱ्या उघड्या ठेवणे, ऑटोरिक्षा, खाजगी वाहतूक अशी कारवाई करण्यात आली. मात्र, कंपनीत कामावर जाणाऱ्या कामगारांवर आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कारवाईतून सवलत देण्यात आली.
----इन्फो--
...अशी झाली कारवाई
विना मास्क : १ हजार २३ लोकांवर कारवाईत ४ लाख ८४ हजार रुपये दंड.
सार्वजनिक जागी थुंकणे : ३८ लोकांककडून ३८ हजार रुपये दंड.
सोशल डिस्टन्सचे उल्लंघन : ५३ आस्थापनांवर कारवाई करत ७३ हजार रुपये दंड.
वेळमर्यादा न पाळणे : २४ दुकानदारांवर कारवाई 83 हजार 500 रुपये दंड.
संचार बंदी उल्लंघन : १४० कारवाईत एक लाख ४० हजार रुपये दंड.
रोड साईड हातगाडी व टपऱ्या :१७ कारवाईत 15 हजार रुपये दंड.
सार्वजनिक वाहतूक रिक्षा : १६ कारवाईत 8 हजार 500 रुपये दंड.
खाजगी वाहतूक करणारे वाहनचालक :18 कारवाईत 9 हजार 500 रुपये दंड
एकूण एक हजार 329 कारवायांमध्ये 8 लाख ५२ हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
---इन्फो--
६०० लोकांची तपासणी; ५० सुपर स्प्रेडर्स
सकाळ सर्कल, अशोकनगर चौक आणि रिलायन्स पेट्रोल पंप येथे नाकाबंदी ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या एक हजार 600 इसमांची तपासणी केली, त्यापैकी 50 जण पॉझिटिव्ह मिळून आले. त्यांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली.
--
फोटो आर वर ०३सातपूर नावाने.
===Photopath===
030521\03nsk_8_03052021_13.jpg
===Caption===
पोलिसांकडून नाकाबंदी