ठाण्याचा सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्टÑ श्री २०२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:29 PM2020-01-22T22:29:03+5:302020-01-23T00:13:00+5:30

राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा बॉडी बिल्डिंग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत ठाणे येथील सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२०’चा मानकरी ठरला, तर मिस महाराष्ट्रच्या किताबाची मानकरी मुंबईची श्रद्धा ढोके ठरली.

Saurabh Shetty of Thane 'Junior Maharashtra 1 Sri 1' | ठाण्याचा सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्टÑ श्री २०२०’

मिस महाराष्ट्र श्रद्धा ढोके.

Next
ठळक मुद्देसिन्नरला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : मुंबईची श्रद्धा ढोके ‘मिस महाराष्टÑ’

सिन्नर : राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा बॉडी बिल्डिंग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत ठाणे येथील सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२०’चा मानकरी ठरला, तर मिस महाराष्ट्रच्या किताबाची मानकरी मुंबईची श्रद्धा ढोके ठरली.
राज्यभरातून ३०० स्पर्धक सहभागी झाले. चेतन पाठारे, प्रशांत आपटे, विक्रम रोठे, शरद मारणे, विजय करंजकर, किरण डगळे, गोविंद लोखंडे, उदय सांगळे, दीपक खुळे, संग्राम कातकाडे उपस्थित होते. गोपाळ गायकवाड, रवींद्र वर्पे,सोमनाथ तुपे, गौरव घरटे, पिराजी पवार, शैलेश नाईक आदींनी नियोजनासाठी मेहनत घेतली.

स्पर्धेचा निकाल
मास्टर्स विभाग - ४० ते ५० वजनी गटात शब्बीर शेख (मुंबई उपनगर) प्रथम, संजय नडगावकर द्वितीय, रमेश पेवेकर (मुंबई) तृतीय. ५० ते ६० वजनी गटात गणेश देवाडीगा (ठाणे) प्रथम, मनीष पोकळे (पुणे) द्वितीय, शशिकांत जगदाळे (मुंबई) तृतीय. ६० वर्षापुढील गटात हरु न सिद्दीक (बीड) यांनी बाजी मारली. दत्तात्रय भट (मुंबई), द्वितीय, प्रमोद जाधव (मुंबई), तृतीय.
४दिव्यांग गट - ६५ किलो खाली वजनी गटात सुदीश शेट्टी (मुंबई) उपनगर यांनी प्रथम क्र मांक मिळविला. प्रथमेश भोसले (मुंबई) द्वितीय, रियाज राय (मुंबई उपनगर) तृतीय, प्रतीक मोहिते (रायगड) चवथा तर राजेंद्र परदेशी (नाशिक) पाचवा आला.
६५ किलावरील वजनी गटात दिनेश चव्हाण (ठाणे) यांनी बाजी मारली. खंडोबा सूर्यवंशी (पुणे) द्वितीय, हुसेन शेख (नाशिक) तृतीय.
४ज्युनिअर गट - ५५ किलो प्रकारात प्रशांत सडेकर (मुंबई उपनगर) याने बाजी मारली. सुमित शडगे (रायगड), शुभम कुंभार (सातारा). ६० किलो वजनी गटात प्रीतेश गमरे (मुंबई) प्रथम आला. ६५ किलो गटात वैभव जाधव, प्रतिक ठाकूर, अजिंक्य पाटील यांनी बाजी मारली. ७० किलो प्रकारात ऋषीकेश कोसरकर (कोल्हापूर) याने प्रथम क्रमांक पटकावला. निखील राणे (मुंबई) द्वितीय तर मयुर शिंदे (नाशिक) याने तृतीय क्रमांक मिळविला. ७५ किलो वनजी गटात खुषल सिंग (मुंबई) प्रथम, प्रफुल्ल पार्ीख (मुंबई) द्वितीय, अविनाश फटांगडे (नगर) तृतीय. ८० किलो वजनी गटात सौरभ शेट्टी याने बाजी मारली. तो ज्यूनीअरच्या किताबाचा मानकरी ठरला. अंकित देशमुख (सातारा) द्वितीय तर साताऱ्याच्याच विठ्ठल तरडे तृतीय आला.
४मिस महाराष्ट्र - प्रकारात मुंबईच्या श्रधा ढोके ही मिस महाराष्ट्र किताबाची मानकरी ठरली. पुण्याच्या अंजली पिल्ले द्वितीय आल्या. मयुरी बोटे (ठाणे) तृतीय आली.

Web Title: Saurabh Shetty of Thane 'Junior Maharashtra 1 Sri 1'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.