सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: December 10, 2015 12:11 AM2015-12-10T00:11:00+5:302015-12-10T00:12:01+5:30

भाजीबाजार : पालिकेने हटविले अतिक्रम

Savarkar Chowk took a breather | सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

Next

णइंदिरानगर : येथील सावरकर चौकात कृष्णकांत भाजी मार्केट बाहेरील भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाची धावपळ झाली आणि रविवारी सुटीच्या दिवशी पालिकेने या विक्रेत्यांना तातडीने हटविले, तसेच पुन्हा येथे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.
इंदिरानगर येथील सावरकर चौकात अनधिकृत भाजी विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, वाहतुकीस अडथळा होत आहे. याच ठिकाण महापालिकेचे अधिकृत मार्केट आहे. पूर्वी याच ठिकाणी भाजीविक्री करणाऱ्या ४० ते ५० विक्रेत्यांना महापालिकेने अशाच प्रकारे अतिक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी अधिकृत भाजी मार्केट तयार करून त्यात ओटे बांधून दिले. त्यामुळेच या व्यावसायिकांना तेथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून या मार्केटबाहेर सावरकर चौकात ७० ते ८० विक्रेत्यांनी व्यवसायाला सुरुवात केली असून, त्यामुळे संपूर्ण चौकात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत व्यावसायिकांमुळे मार्केटमध्ये अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आणि त्यांनी यासंदर्भात विक्रेत्यांनी महापालिकेकडे आणि स्थानिक नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांंच्याकडे तक्रार केल्यानंतर दखल घेतली जात नसल्याची कैफियत विक्रेत्यांनी मांडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर तातडीने पालिकेने दखल घेत रविवारीच (दि.६) अतिक्रमण विरोधी मोहीम राबवित अनधिकृत विक्रेत्यांना हटविले.

Web Title: Savarkar Chowk took a breather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.