चांदोरी विद्यालयात पक्षी वाचवा अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:16 PM2021-03-23T19:16:47+5:302021-03-23T19:17:06+5:30
चांदोरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी विद्यालयात जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून ह्यचिमणी वाचवा, पक्षी वाचवाह्ण या अभियानाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य यांच्या संकल्पनेतूनच करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी होते. यावेळी त्यांनी पक्ष्यांचे पर्यावरणाच्या समतोलामधील महत्त्व सांगितले. पक्षी वाचविले तर त्यांचे जातिसातत्य टिकून राहील हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच असा उपक्रम आपण विद्यालयात सुरू करत आहोत. तसेच पक्षी वाचविण्याच्या या उपक्रमाची माहिती सर्व वर्गाच्या व्हॉटसॲप ग्रुपवरून विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाप्रसंगी उपप्राचार्य इंद्रकुमार त्र्यंबके, पर्यवेक्षक पांडुरंग जगताप, भाऊसाहेब माने तसेच ज्येष्ठ शिक्षक वसंत टर्ले, राजेंद्र टर्ले, कैलास बागले, शरद गडाख, कमलाकर गावीत, विष्णू कोरडे, किशोर गांगुर्डे, निलेश गावीत, घनश्याम मोरे, अतुल हांडगे, अशोक कोकाटे आदी उपस्थित होते.