मांज्यात अडकलेल्या कोकिळेला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:27 AM2020-12-21T00:27:35+5:302020-12-21T00:28:02+5:30

नाशिकरोड येथील रोकडोबा वाडीतील पिंपळाच्या झाडावर मांज्यात अडकलेल्या कोकिळा पक्ष्याला पक्षीमित्रांनी जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले.

Save the life of a cuckoo trapped in a cage | मांज्यात अडकलेल्या कोकिळेला जीवदान

मांज्यात अडकलेल्या कोकिळेला जीवदान

Next

नाशिक: नाशिकरोड येथील रोकडोबा वाडीतील पिंपळाच्या झाडावर मांज्यात अडकलेल्या कोकिळा पक्ष्याला पक्षीमित्रांनी जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले. मांज्यात अडकल्यामुळे कोकिळाच्या पंखांना गंभीर जखम झाली होती. त्यामुळे तिला उडताही येत नव्हते. कावळ्यांनीही टोच मारून जखमी केले होते. तेथेच राहणाऱ्या बाळा पवार, सुमित लाल व सुशील गवळी यांनी जखमी अवस्थेतील पक्ष्याला झाडावरून सुखरूप काढले. त्यानंतर गोमाता व वन्यजीव सरंक्षण व संवर्धन बहूद्देशीय संस्थेचे सुशांत बागुल व नवनाथ ढगे यांच्या स्वाधीन केले. त्यानी जखमी कोकिळा पक्ष्यावर उपचार करून जंगलात नेऊन मुक्त केले.

 

Web Title: Save the life of a cuckoo trapped in a cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.