रूग्णांच्या बिलात अडीच कोटींची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:03 AM2020-10-04T00:03:11+5:302020-10-04T01:18:39+5:30
नाशिक- खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी गेल्य दोन महिन्यात विविध रूग्णालयातील बिले तपासून तब्बल अडीच कोटी रूपयांहून अधिक रकम रूग्णांना परत केली आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा अर्थिक दिलासा मिळाला आहे.
नाशिक- खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी गेल्य दोन महिन्यात विविध रूग्णालयातील बिले तपासून तब्बल अडीच कोटी रूपयांहून अधिक रकम रूग्णांना परत केली आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा अर्थिक दिलासा मिळाला आहे.
खासगी रूग्णालयाकडून शासनाने विहीत केलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेची बिले आकरल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार महापलिकेने खासगी रूग्णालयांमध्ये लेखा परीक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील १३२ रूग्णालयांमध्ये लोखा परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. रूग्णांना दिलेली बिले तपासून ती अतिरीक्त असल्यास घेतलली रक्क म पुन्हा रूग्णांना परत करण्याची जबाबदारी लेखा परीक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बिलांबाबतच्य
तक्रारींची देखील शहानिशा करून रक्कम परत केली जाते. गेल्या २४ जुलै पासून या लेखा परीक्षकांनी प्रत्यक कामाला सुरूवात केली आहे. या लेखा परीक्षकांनी ८९ रूग्णालयांमधील १३ हजार ८११ बिले तपासणीसाठी दाखल झाली.
त्यातील ७ हजार ७२१ बिले तपासण्यात आली असून रूग्णांकडून अतिरीक्त आकारण्यात आलेले २ कोटी ५८ लाख ४७ हजार ६८१ रूपये ज्यादा आकारण्यात आल्याने ही रक्क म परत देण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात ठिकठिकाणी अशाप्रकारे रूग्णालयांकडून अतिरीक्त रक्कम आकारल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आॅडीटर नियुक्त करण्याच्या शासनाच्या आदेशामुळे रूग्णांना आर्थिक दिलासा मिळत आहे. नाशिकमध्ये देखील नागरीक तक्रार करीत असून त्याची दखल महापालिका घेत आहेत. रक्कम परत न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई देखील केली जात आहे.