संदर्भ सेवा शिबिरासाठी शालेय विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:02 PM2019-11-21T19:02:00+5:302019-11-21T19:03:52+5:30

दिंडोरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व समग्र शिक्षा अभियान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संदर्भ सेवा शिबिरात १७० विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले.

School students' spontaneous response to a reference service camp | संदर्भ सेवा शिबिरासाठी शालेय विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

संदर्भ सेवा शिबिरासाठी शालेय विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्देदिंडोरी येथे संदर्भ सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडोरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व समग्र शिक्षा अभियान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संदर्भ सेवा शिबिरात १७० विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार, गटशिक्षण अधिकारी बी. डी. कनोज व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामीण रु ग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली ग्रामीण रु ग्णालय दिंडोरी येथे संदर्भ सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डा.ॅ विलास पाटील यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून शिबिराचे उदघाटन केले. या शिबिरात आरोग्य तपासणी पथकाद्वारे शाळा व अंगणवाडीमध्ये तपासलेल्या विद्यार्थ्यांमधून संदर्भीत विद्यार्थी या शिबिरात उपस्थित होत. तालुक्याच्या विविध भागातून उपचारासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैदयकीय अधिकारी डॉ. दीपक बागमार यांनी संदर्भ सेवा शिबिराची संकल्पना स्पष्ट केली, तसेच बाल रोगतज्ञ डॉ. समीर काळे यांनी विविध आजाराबाबत उपस्तीत विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले. या शिबिरात बालरोग, अस्थीरोग, डोळ्यांचे विकार, हृदय रोग, मूत्रिपंड बाबत १७० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
काही विद्यार्थ्यांवर उपचार तर काहींना पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर उपचारासाठी शासकीय रु ग्णालय नाशिक येथे संदर्भित करण्यात आले. या शिबिरात डॉ. दीपक बागमार, डॉ अश्विनी वाकचौरे, डॉ. समर्थ देशमुख, डॉ. गौरी निराहले, डॉ. सीमा गांगुर्डे, डॉ. सुचिता कोशिरे, डॉ. सायली गांगुर्ड आदींनी तपासणी केली.
या शिबिराप्रसंगी ज्ञानेश्वर क्षीरसागर, समाधान दाते, दीपक पाटील, पौर्णिमा दीक्षित, रीना पवार, वैशाली तरवारे, अश्विनी जाधव, कल्पना गवळी आदींसह राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म अंतर्गत कार्यरत विविध कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शालेय आरोग्य तपासणीची गुणवत्तेसाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे संदर्भ सेवा शिबिर आयोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आली.

 

Web Title: School students' spontaneous response to a reference service camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.