नांदूरशिंगोटेत सर्पदंशाने शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:07 AM2021-08-02T04:07:02+5:302021-08-02T04:07:02+5:30
योगेश शेळके हे आई, वडील, पत्नी व मुलांसह वस्तीवर राहत असून, वस्तीजवळच शेतजमीन आहे. शेळके कुटुंब जवळच्या शेतात भुईमुगाच्या ...
योगेश शेळके हे आई, वडील, पत्नी व मुलांसह वस्तीवर राहत असून, वस्तीजवळच शेतजमीन आहे. शेळके कुटुंब जवळच्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत होते. पावसाचे वातावरण असल्याने शेंगा झाकण्यासाठी आर्यन हा प्लास्टिक कागद आणण्यासाठी गेला असताना त्याच्या पायाला सर्पाने दंश केला. त्याला तातडीने आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत दीपक बर्के यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात सर्पदंशाने परिसरातील चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
चौकट :
आर्यनला लहानपणापासूनच कराटे खेळण्याची आवड होती. त्यासाठी आई व वडील यांनी त्याला मदत केली. २०१९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत त्याने कराटेचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आर्यनची निवड झाली होती. यावर्षी तो पाचवीच्या इयत्तेत दाखल झाला होता. दीड वर्षापासून लाॅकडाऊन असल्याने त्याचे स्पर्धेसाठी जाणे रेंगाळले होते.
फोटो - ०१आर्यन शेळके.
010821\01nsk_26_01082021_13.jpg
फोटो - ०१आर्यन शेळके.