आता पुरात शाळा बुडणार नाही; शिक्षण थांबणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:52+5:302021-07-23T04:10:52+5:30
जलालपूर येथे नुकताच हा लोकार्पण सोहळा झाला. जलालपूर गावचे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीबाबा फडोळ यांच्या हस्ते शाळेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात ...
जलालपूर येथे नुकताच हा लोकार्पण सोहळा झाला. जलालपूर गावचे ज्येष्ठ नागरिक निवृत्तीबाबा फडोळ यांच्या हस्ते शाळेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारडा उद्योग समूहाचे अध्यक्ष किसनलाल सारडा होते. यावेळी गावच्या सरपंच हिराबाई गभाले, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मोतीराम रानडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष निवृत्ती रानडे, केंद्रप्रमुख साहेबराव देवरे, सारडा परिवाराचे सदस्य किरणदेवी सारडा, सारडा समूहाचे कार्यकारी संचालक श्रीरंग सारडा आदींसह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.
‘जलालपूर हे आमच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा यांचे गाव होते. त्यामुळे गावाबद्दल पहिल्यापासूनच आपुलकी आहे. त्यातूनच तिच्या गावी ही शाळा उभारण्याची प्रेरणा मिळाली, असे मत किसनलाल सारडा यांनी यावेळी व्यक्त केले. शाळा उभारणीच्या निमित्ताने गावाने आम्हांला सेवा करण्याची संधी दिली, त्याचा आनंद वाटतोय, असे श्रीरंग सारडा यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
छायाचित्र ओळी : आर फोटोवर २३ सारडा प्रतिष्ठान....
जलालपूर येथील शाळेच्या कोनशिला अनावरण अनावरणाप्रसंगी
नूतन शाळेचे कोनशिला अनावरण करताना निवृत्तीबाबा फडोळ तसेच किसनलाल सारडा. समवेत दिनेश पाटील, रमेश उबाळे, हिराबाई गभाले,श्रीरंग सारडा, किरणदेवी सारडा,भगवान गभाले, पप्पू मोहिते, निवृत्ती फडोळ, काळू बोकड आदी.