पाटोदा येथील विद्यार्थ्यांना स्काउटचा राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:16 AM2019-08-09T01:16:44+5:302019-08-09T01:17:05+5:30
पाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे राम बोनाटे, रितेश पानसरे, अनिकेत बाविस्कर, यश आहेर, अबुजर शेख, गौरव शेळके, सूरज सोनवणे हे सात स्काउट्स उत्तीर्ण झाले. त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पाटोदा जनता विद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त स्काउट्स. समवेत मुख्याध्यापक एन.ए. दाभाडे, पर्यवेक्षक डी.बी. पाटील, प्रा. अहिरे व स्काउट शिक्षक बी.एन. कदम.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे राम बोनाटे, रितेश पानसरे, अनिकेत बाविस्कर, यश आहेर, अबुजर शेख, गौरव शेळके, सूरज सोनवणे हे सात स्काउट्स उत्तीर्ण झाले. त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रमाणपत्र व सेवापदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांना स्काउट शिक्षक बी.एन. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा नाशिक भारत स्काउट आणि गाइड जिल्हा संस्थेच्या अध्यक्ष तथा मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, मविप्र येवला तालुका संचालक रायभान अण्णा काळे, सचिव राजेंद्र निकम, विभागप्रमुख चंद्रकांत फुलपगारे, जिल्हा संघटन आयुक्त राजेंद्र महिरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष सूर्यभान पा. नाईकवाडे, रतन बोरणारे, सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थआदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.